पुणे

लम्पी स्कीन प्रतिबंधासाठी सर्व पशुधनाचे लसीकरण करा

CD

पुणे, ता. १८ : राज्यात आतापर्यंत सात हजार ३४१ पशूधन हे लम्पी स्कीन आजाराने बाधित झाले आहे. त्यामुळे या आजाराच्या प्रतिबंधासाठी सर्व पशुधनाचे लसीकरण तातडीने पूर्ण करा आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी गोवर्गीय पशुधनावर अधिक लक्ष केंद्रित करावे, असा आदेश राज्याचे पशुसंवर्धन सचिव तुकाराम मुंडे यांनी पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांना दिला.
लम्पी स्कीन आजाराचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सची बैठक गुरुवारी (ता.१७) पुण्यात झाली. त्या वेळी मुंडे बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन आयुक्त हेमंत वसेकर, अतिरिक्त आयुक्त शीतलकुमार मुकणे, बेंगळुरू येथील राष्ट्रीय पशू साथरोगशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान (निवेदी) संस्थेच्या डॉ. मंजुनाथ रेड्डी, ‘माफसू’चे संशोधक संचालक डॉ. नितीन कुरकुरे, विस्तार संचालक अनिल बिकाने, विविध पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि संशोधक उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. सद्यःस्थितीत या आजाराने बाधित असलेल्या सात हजार ३४१ पशुधनावर उपचार सुरू आहेत. राज्यातील सर्व पशुधनाचे लसीकरण १०० टक्के पूर्ण करण्यासाठी वेगाने प्रयत्न करा. पशुधन आजारी पडू नये, यासाठी ग्रामपंचायतींच्या मदतीने गाव पातळीवर जनजागृती मेळावे घेण्यात यावेत. आजारी पशुधनाला अन्य जनावरांपासून दूर ठेवावे, आदी सूचना मुंडे यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना केल्या.

‘लम्पी स्कीन’वरील उपाययोजना
- गोठ्यांचे निर्जंतुकीकरण करा
- पावसाळ्यात गोठ्याच्या परिसरात पाणी न साठण्याची खबरदारी घ्या
- गाव, गोठा आणि परिसरात सातत्याने कीटकनाशकांची फवारणी करा
- गाय, बैलांना अशक्तपणा, ताप आल्यास तातडीने उपचार करा
- उपचारासाठी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घ्या
- आजारी पशुधनाला अन्य पशुधनापासून लांबच्या अंतरावर ठेवा
- गोठा आणि परिसर स्वच्छ ठेवावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरातशी संबंधित मालमत्ता बड्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या नावे, ईडीचा ससेमिरा मागे लागणार; सरकारी बाबूंचे धाबे दणाणले

US-Iran War: ''रात्रीतून सगळं संपेल...'' इराणसोबतच्या बैठकीवरुन अमेरिकेचं मोठं विधान

Chhatrapati Sambhajinagar: भामट्यांनी दोन दिवसांत हिसकावले तिघींचे मंगळसूत्र; सांगा, रात्री घराबाहेर जाणे टाळावे का?

Chhatrapati Sambhajinagar: उभ्या ट्रकला आयशर धडकला; वडोद बाजार फाट्यावरील घटना; चालक गंभीर जखमी

महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा इशारा, अकोला जगात सर्वात उष्ण शहर, टॉप १५ मध्ये राज्यातली पाच शहरं

SCROLL FOR NEXT