Pune-Railway-Station sakal
पुणे

Pune Railway : पुणे विभागात रेल्वेचा उद्या ‘ब्लॉक’ वार

इंटरसिटी, डेक्कन, प्रगती; हडपसर, नीरा-लोणंददरम्यान गाड्या रद्द

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे विभागात रविवारी (ता. २०) तीन ठिकाणी कामानिमित्ताने ब्लॉक घेण्यात आले आहे. यात खडकी-चिंचवड, नीरा-लोणंद व हडपसर स्थानकाचा समावेश आहे. त्यामुळे पुण्याहून सुटणाऱ्या व पुणे विभागातून धावणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या रद्द त काहींच्या वेळांत बदल झाला आहे.

खडकी-चिंचवड रेल्वे स्थानकादरम्यान ऑटोमॅटिक सिग्नलिंग यंत्रणेचे काम सुरु आहे. रविवारी (ता. २०) तांत्रिक कामे केली जाणार असल्याने पुणे-मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. सकाळी ७.१५ ते दुपारी ४.१५ पर्यंत हा ब्लॉक आहे.

या लोकल रद्द
- पुणे-तळेगाव : सकाळी ६ वाजून ४८ मिनिटांनी
- पुणे-तळेगाव : सकाळी ८ वाजून ५३ मिनिटांनी
- पुणे-लोणावळा : सकाळी ६ वाजून ३० मिनिटांची, सकाळी ९ वाजून ५७ मिनिटांनी, सकाळी ११ वाजून १७ मिनिटांनी, दुपारी तीन वाजता, दुपारी ४ वाजून २५ मिनिटांनी.

- शिवाजीनगर-तळेगाव : दुपारी ३ वाजून ४७ मिनिटे,सायंकाळी ५ वाजून २० मिनिटे.
- शिवाजीनगर-लोणावळा ः सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी.
- लोणावळा-शिवाजीनगर : सकाळी ६ वाजून ३० मिनिटे, सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी, दुपारी ३ वाजून ३० मिनिटे.
- तळेगावहून सुटणारी सकाळी ७ वाजून ४८ मिनिटे, सकाळी ९ वाजून ५७ मिनिटांनी, दुपारी ४ वाजून ४० मिनिटांनी, लोणावळाहून सकाळी ७ वाजून २५ मिनिटे, सकाळी ८ वाजून २० मिनिटे, दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

हे लक्षात ठेवा
- पुणे-जयपूर एक्स्प्रेस ही गाडी पुण्याहून संध्याकाळी पावणे सहा वाजता सुटेल.
- दौंड-इंदूर एक्स्प्रेस दौंडहून सायंकाळी सहा वाजता सुटेल.
- मुंबई-चेन्नई, लोकमान्य तिलक टर्मिनस-काकीनाडा पोर्ट, मुंबई-भुवनेश्वर, मुंबई-हैदराबाद या गाड्यांना पुणे विभागातून धावताना आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावतील.

दरम्यान, पुणे-सातारा रेल्वे मार्गावरील नीरा-लोणंद स्थानक दरम्यान ब्लॉक घेण्यात आला. यात पुणे-कोल्हापूर डेमू एक्स्प्रेस पुणेऐवजी सातारा येथून कोल्हापूरसाठी रवाना होईल. त्यामुळे परतीच्या प्रवासात ती गाडी कोल्हापूर ते सातारा अशी धावेल. सातारा ते पुणे अशी धावणार नाही. शनिवार (ता. १९) चंडीगड-यशवंतपूर एक्स्प्रेस दौंड-कुर्डुवाडी-मिरज या बदललेल्या मार्गाने धावेल. रविवारी सकाळी १०. ५५ ते दुपारी १.५५ या दरम्यान हडपसर स्थानकावरून धावणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आलेले आहे.

असा आहे बदल
पुणे-दौंड डेमू, दौड-पुणे डेमू या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर पुणे-हबीबगंज ही रेल्वे पुणे स्थानकावरून दुपारी पाच वाजता सुटेल, हैदराबाद-हडपसर ही गाडी दौड स्थानकापर्यंतच धावेल, चेन्नई-कुर्ला ही रेल्वे दौंड, मनमाड मार्गे धावेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Woman Love Relationship : सैराटपेक्षाही धक्कादायक! पतीला सोडून प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय, घरच्यांनी विष पाजलं; मृतदेह जाळला अन्, कर्नाटक -महाराष्ट्र कनेक्शन

Solapur Sugar Mills : साेलापूर जिल्ह्यात साखर कारखानदारांना प्रशासनाचे अभय; चारशे कोटींहून अधिक थकीत, मोजक्याच कारखान्यांवर कारवाई!

होर्मुझनंतर मलक्का सामुद्रधुनीकडे वळले ट्रम्प, भारतापासून १५० किमी अंतरावर; अमेरिकेनं केला मोठा करार, चीनची कोंडी

Investment: SIP की PPF? 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीत 15 वर्षांत कुठे मिळणार जास्त पैसा; जाणून घ्या सोप्या शब्दांत

'मला डिव्होर्सी मुलगाच हवा होता' लग्नासाठी अपूर्वा नेमळेकरचं होतं स्पष्ट मत, म्हणाली...'ज्याला त्या दुखाची जाणीवच...'

SCROLL FOR NEXT