पुणे

केसरी गणेशोत्सवाला मंगलमय वातावरणात प्रारंभ

CD

पुणे, ता. २० ः ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात आणि मंगलमय वातावरणात केसरी गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. टिळक पंचांगानुसार केसरीवाड्यात रविवारी दुपारी १२.२० वाजता गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. केसरीवाडा हा मानाचा पाचवा गणपती आहे.
ऐतिहासिक आणि वैभवशाली परंपरा असलेल्या या गणपतीच्या मिरवणुकीला रमणबाग चौकातून सकाळी ९.४५ वाजता प्रारंभ झाला. ढोल-ताशांच्या गजरात सुरू झालेल्या मिरवणुकीदरम्यान पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. त्यामुळे ढोल-ताशा पथकातील वादकांचा आणि गणेशभक्तांचा उत्साह द्विगुणित झाला. ओंकारेश्वर मंदिर चौक, वर्तक उद्यान, नारायणपेठ पोलिस चौकी आणि केळकर मार्गाने केसरीवाड्यात मिरवणूक आली. टिळक वाड्यातील गणेश मंदिरासमोर अभिनव कलाभारतीतर्फे आकर्षक रांगोळी साकारण्यात आली होती.
‘केसरी’चे विश्वस्त-संपादक व टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक, विश्वस्त-सरव्यवस्थापक डॉ. रोहित टिळक, विश्वस्त डॉ. प्रणती टिळक, ‘केसरी’च्या विश्वस्त-व्यवस्थापिका डॉ. गीताली टिळक मिरवणुकीत सहभागी झाले होते. डॉ. रोहित आणि डॉ. प्रणती यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. या वेळी पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संदीपसिंग गिल यांच्या हस्ते आरती करण्यात आली. गणेशोत्सवादरम्यान २४ ते २८ ऑगस्टपर्यंत दररोज सायंकाळी ६.३० वाजता केसरीवाड्यातील लोकमान्य सभागृहात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : आजारपणानंतर संजय राऊत पहिल्यांदाच माध्यमांसमोर; महायुतीवर जोरदार टीका, काँग्रेसला लगावला टोला, प्रकृतीबाबतही दिली अपडेट

Kolhapur Crime : लग्न सोहळ्यासाठी आलेल्या 7 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; कात्यायनी मंदिर परिसरात उसाच्या शेतात नेऊन...

टीव्हीवरचे बहिण-भाऊ खऱ्या आयुष्यात झाले नवरा बायको! मराठी अभिनेता अडकला लग्नबंधनात, फोटो चर्चेत

PM Narendra Modi : पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा अन् रणनीती बदला, मी मार्गदर्शन करतो; पंतप्रधान मोदींचे विरोधकांना आवाहन

Devendra Fadnavis: ''निवडणूक आयोगाचं चुकलं, कुणाचा सल्ला घेतात माहिती नाही'' मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप

SCROLL FOR NEXT