पुणे

झूलॉजी असोसिएशन फोरमचे ‘फर्ग्युसन’मध्ये उद्‍घाटन

CD

पुणे, ता. २१ ः जैवशास्त्रात संशोधनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्या संधींचे सोने करून घेता आले पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी संशोधकवृत्ती वाढवत संशोधनाकडे डोळसपणे पाहावे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. राधाकृष्ण पंडित यांनी व्यक्त केले. फर्ग्युसन महाविद्यालयातील झूलॉजी असोसिएशन फोरमचे उद्घाटन डॉ. पंडित यांच्या हस्ते झाले.
डॉ. पंडित म्हणाले, ‘‘वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान आदी विषयांमध्ये संशोधनाच्या आणि रोजगाराच्या केवळ भारतात नाही तर परदेशातही संधी आहेत. संशोधन करण्याची जिज्ञासा आणि कष्ट करण्याची तयारी तुम्हाला संशोधक बनवू शकते. संशोधक बनून तो विद्यार्थी समाजातील विविध प्रश्न शास्त्रीय पद्धतीने सोडवू शकतो. यातून पर्यायाने समाजाची आणि देशाची सेवा करण्यासाठी संधी मिळते. तसेच जैववैद्यकीय आणि कृषी संशोधन क्षेत्रांमध्येदेखील संशोधनासाठी विशेष संधी उपलब्ध आहेत.’’ या वेळी प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Uruli Kanchan Ganpati Visarjan : उरुळी कांचन येथील गणेश विसर्जन मिरवणूक रंगली १५ तास! मात्र डीजेला दिला मंडळानी फाटा

Beed News : करपलेली पिके अन् डोळ्यात अश्रू... बीडच्या बांधावर 'पालकमंत्री' सुनेत्रा पवार अन 'पंकजाताई मुंडे'

SCROLL FOR NEXT