पुणे

प्रॉडक्ट फोटोग्राफीतून वाढवा आपला व्यवसाय

CD

पुणे, ता. २१ : फोटोग्राफीच्या विविध प्रकारांमध्ये ‘प्रॉडक्ट फोटोग्राफी’ हा एक विशेष प्रकार आहे, ज्याला सध्या व्यावसायिक व उद्योजकांकडून मागणी आहे. याबाबत मार्गदर्शन करणारे चार दिवसांचे प्रशिक्षण २३, २४ व ३०, ३१ ऑगस्ट रोजी आयोजिले आहे. यामध्ये प्रॉडक्ट फोटोग्राफीचे १७ हून अधिक साधने व तंत्र, पाचहून अधिक कौशल्ये याबाबत प्रात्यक्षिकांसहित मार्गदर्शन होणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यास प्रमाणपत्र मिळेल. दोन दिवसांचे क्लासरूम प्रशिक्षण व दोन दिवसांचे प्रात्यक्षिक व एडिटिंग असे प्रशिक्षणाचे स्वरूप आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ७००० रुपये.

दूध प्रक्रिया लघुउद्योग
दुधावर प्रक्रिया करून तयार केलेल्या पदार्थांना भरपूर मागणी असते. दूध तसेच दुग्धजन्य पदार्थांचा स्वतःचा स्टार्ट-अप सुरु करण्याच्या विचार असणाऱ्यांसाठी प्रमाणपत्र प्रशिक्षण शनिवारी (ता. २६) व रविवारी (ता. २७) आयोजिले आहे. दूध प्रक्रिया उद्योगातील संधी, दूध संकलन, दुधाची साठवण, पाश्‍चरायझेशन, होमोजिनाईजेशन, प्रिझर्व्हेशन, क्रिम सेपरेशन, दुधापासून खवा, पेढा, पनीर, लस्सी, दही इ. पदार्थांची कृती, प्रात्यक्षिक, यंत्रसामग्री, प्रकल्प आराखडा, प्रॉडक्‍ट मार्केटिंग इ.विषयी प्रशिक्षणात मार्गदर्शन होणार आहे. प्रशिक्षणात खवा, पनीर, लस्सी, दही इ.पदार्थ प्रात्यक्षिकाद्वारे तयार करण्यास शिकवले जातील. यशस्वी दूध प्रक्रिया उद्योजक यामध्ये अनुभव सांगणार आहेत. प्रतिव्यक्ती शुल्क चार हजार ५०० रुपये. गुरुवारपर्यंत (ता. २४) नोंदणी केल्यास ५०० रुपये सवलत मिळेल.
संपर्क ः ९१४६०३८०३१, ८९५६३४४४७२
ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्माचे शतक! शुभमन गिलसोबत विक्रमी भागीदारी; गांगुली-तेंडुलकर यांचा १९९८ चा विक्रम संकटात...

Satara DJ Rules: सण-उत्सवात डीजेचा आवाज वाढवला तर खिसा रिकामा! व्यक्तीला ५० हजार, मंडळांना १ लाखांची अनामत

SCROLL FOR NEXT