पुणे

बारावी विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी

CD

पुणे, ता. २१ : बारावीच्या मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेतली जाते. पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता यावा, हा त्यामागील उद्देश. परंतु राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच काही अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया संपवत हात वर केले आहेत. त्यामुळे पुरवणी परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी आहे.
बारावी बोर्डाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी यापूर्वी ऑक्टोबरमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येत होती. परंतु विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊन शैक्षणिक नुकसान होत होते. त्यामुळे राज्य सरकारने बारावीची पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २०१५पासून पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेतली जात आहे. परंतु आता या मुख्य उद्देशाला बगल देण्याचे काम राज्य सरकारच्या सीईटी सेलमार्फत होत आहे. सध्या सीईटी सेलने विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे पुरवणी परीक्षा दिलेल्या आणि विधी अभ्यासक्रमाच्या सीईटीत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षा अपुऱ्या राहण्याची चिन्हे आहेत. तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘नॉन कॅप’ अंतर्गत विद्यार्थ्यांना २५ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. परंतु या कालावधीत पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर न झाल्यास अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी सीईटीत पात्र ठरूनही विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर टांगती तलवार आहे.

‘सीईटी सेल’चे म्हणणे
‘‘व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला आधीच उशीर होत आहे. सीईटी सेल अंतर्गत होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत आणखी विलंब करून चालणार नाही. त्यामुळे बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल लागेपर्यंत प्रवेश प्रक्रिया थांबविता येणार नाही,’’ असे सीईटी सेलतर्फे सांगण्यात आले.

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल ऑगस्ट अखेरपर्यंत लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ प्रयत्नशील आहे.
- अनुराधा ओक, सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ


.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT