पुणे

पुरावा न मिळाल्याने अमोल काळेचे नाव दोषारोपपत्रात नाही

CD

डॉ. दाभोलकर हत्येबाबत
काळेविरुद्ध पुरावे नाहीत
तत्कालीन तपास अधिकाऱ्याची माहिती
पुणे, ता. २१ : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी अमोल काळे याच्याविरोधात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या अनुषंगाने कोणताही पुरावा मिळाला नाही. त्यामुळे त्याचे नाव दोषारोपपत्रात समाविष्ट केले नाही, अशी माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) तत्कालीन तपास अधिकारी एस. आर. सिंग यांनी सोमवारी (ता.२१) न्यायालयातील उलट तपासणीत दिली.
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याची सुनावणी येथील विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सुरू आहे. बचाव पक्षाकडून सिंग यांची उलटतपासणी घेण्यात आली. काळे याची मानसशास्त्रीय मूल्यमापन चाचणी केली का, ब्रेन मॅपिंगसाठी अर्ज केला होता का, अशा प्रश्नांची सरबत्ती सिंग यांच्यावर करण्यात आली. त्यावर त्यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले.
या गुन्ह्यात सीबीआयने अमोल काळे याला २१ मे २०१८ रोजी अटक केली होती. त्यानंतर अमित डिगवेकर आणि राजेश बंगेरा यांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले होते.
डॉ. दाभोलकर यांच्यावर शरद कळसकर यानेच गोळी झाडल्याचा दावा सीबीआयने केला होता. या सर्व तपासाचा धागा पकडत बचाव पक्षाचे ॲड. प्रकाश साळशिंगीकर यांनी अमोल काळे याच्याविषयी सिंग यांना प्रश्न विचारले. ‘काळे याने शस्त्र आणि दुचाकी पुरविली होती, याची माहिती मिळाली होती का? त्यावर ‘हो’ असे उत्तर सिंग यांनी दिले. मग त्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न केला का? त्यावर सिंग यांनी नकारार्थी उत्तर दिले. त्याचे कुणाशी संबंध होते याबाबत चौकशी केली का? याचे आर्थिक स्रोत काय होते हे तपासण्याचा प्रयत्न केला का? अमोल आणि इतर आरोपीचा मोबार्इलद्वारे संवाद झाला का? असे प्रश्न ॲड. साळशिंगीकर यांनी विचारले. त्यावर सिंह यांनी ‘नाही’ असे उत्तर सांगितले. सिंग यांची उर्वरित उलटतपासणी मंगळवारी (ता.२२) होणार आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT