पुणे

पीएमपी बसमध्ये महिलांचे दागिने चोरणाऱ्यांना अटक

CD

पुणे, ता. २१ : पीएमपी बसमध्ये महिलांच्या सोन्याच्या बांगड्या चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून २५ ग्रॅम वजनाची सोन्याची पाटली आणि कटर जप्त केले.
संतोष ऊर्फ मॅनेजर शरणप्पा जाधव (वय ४१, रा. मांजरी बुद्रूक, हडपसर, मूळ कर्नाटक) आणि सुधीर ऊर्फ तुंड्या नागनाथ जाधव (वय ४५, रा. शास्त्रीनगर, अंबरनाथ, जि. ठाणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. महिलांच्या सोन्याच्या बांगड्या कटरने तोडून चोरी करणारा सराईत गुन्हेगार संतोष जाधव आणि त्याचा साथीदार कोरेगाव पार्क परिसरातील एका चहाच्या हॉटेलजवळ असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यावरून दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या पथकाने आरोपींना अटक केली. त्यांना शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT