pmc vikram kumar Pace of river bank improvement work between Bundagarden to Mundhwa sakal
पुणे

Pune News : ‘नदीकाठ सुधार’ला आणखी गती द्या; पुणे महापालिका आयुक्तांचा आदेश

बंडगार्डन ते मुंढवा दरम्यान १२ टक्केच काम

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बंडगार्डन ते मुंढवा दरम्यानच्या नदीकाठ सुधारच्या कामाची गती मंदावली आहे. ऑगस्टअखेरपर्यंत २० टक्के काम पूर्ण होणे अपेक्षित असताना केवळ १२ टक्के काम झाले आहे. त्यामुळे गुरुवारी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी संबंधित ठेकेदाराचे कान टोचत कामाची गती वाढविण्याचा आदेश दिला.

आयुक्त विक्रम कुमार यांनी गुरुवारी महापालिकेचे अधिकारी, ठेकेदार यांची महापालिकेत बैठक घेतली. संगमवाडी ते बंडगार्डन या टप्प्याचे काम ३२ टक्के होणे अपेक्षीत होते, तेथे ३० टक्के पूर्ण झाले आहे. पण बंडगार्डन ते मुंढवा या टप्प्याचे काम २० टक्के होणे अपेक्षीत असताना केवळ १२ टक्के काम पूर्ण झाले आहे.

संगमवाडी ते बंडगार्डन या कामासाठी सुमारे ४०० कर्मचारी, मजूर रोज कामावर आहेत, पण बंडगार्डन ते मुंढवा दरम्यान केवळ १३० जणांकडून काम करून घेतले जात असल्याचे बैठकीत निदर्शनास आले. त्यावर नाराजी व्यक्त करत आयुक्तांनी मनुष्यबळाची संख्या वाढवून काम वेगात करा, असा आदेश दिला आहे, असे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सांगितले.

राज्य सरकारने वृक्ष प्राधिकरणाच्या कायद्यात बदल करून वृक्षतोडीसंदर्भातील सरकारचा अधिकार महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. नदीकाठ सुधारच्या कामासाठी झाडे तोडली जाणार असल्याने महापालिकेने त्यासाठी महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाकडे अर्ज केला होता.

पण आता कायद्यात बदल केल्याने हे अधिकार पुन्हा महापालिकेला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात या कायद्यातील तरतुदींचे पालन करून आयुक्त विक्रम कुमार हे निर्णय घेणार आहेत. दरम्यान, या कामामध्ये सुमारे सात हजार झाडे तोडली जाणार आहेत. त्याबदल्यात महापालिका सुमारे ६० ते ६५ हजार झाडे लावणार आहे, असे खेमनार यांनी सांगितले.

प्रकल्पाबाबत...
- नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत मुळा-मुठा नदीचा काठ सुशोभित केला जाणार
- सध्या संगमवाडी ते बंडगार्डन (३.७ किलोमीटर) आणि बंडगार्डन ते मुंढवा (५.३ किलोमीटर) हा नदीकाठ सुशोभित करण्याचे काम सुरू
- कामासाठी अनुक्रमे २६५ कोटी आणि ६०४ कोटी रुपयांचा खर्च
- नदीकाठ सुधारचे काम सुरू झाल्यानंतर नेमके हे काम कसे असणार आहे, याची कल्पना नागरिकांना यावी यासाठी महापालिकेने बंडगार्डन येथे ३०० मीटर अंतराचे काम प्राधान्याने पूर्ण केले आहे.

पुणे महापालिका आयुक्तांनी नदीकाठ सुधार प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. बंडगार्डन ते मुंढवा टप्प्याचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे मनुष्यबळामध्ये वाढ करून कामाचा वेग वाढविण्याचा आदेश ठेकेदारास दिला आहे. नदी सुधार योजनेचा तिसरा टप्पा असलेल्या बाणेर ते वाकड हा आठ किलोमीटरच्या कामाच्या निविदेला मुदतवाढ दिली आहे.
- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT