पुणे

मराठी भाषा विद्यापीठ स्थापना समितीचा विस्तार

CD

पुणे, ता. ३१ : उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी केलेल्या समितीचा विस्तार केला आहे. या समितीत आणखी सात सदस्यांचा समावेश केला आहे.
मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेच्या अनुषंगाने उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण विभागाने ११ जुलै २०२३ रोजी समिती स्थापन केली. या समितीचा विस्तार करण्यात आला आहे. या समितीत आता डॉ. रमेश वरखेडे (नाशिक), डॉ. दिलीप धोंडगे (सटाणा), डॉ. केशव देशमुख (नांदेड), डॉ. रूपाली शिंदे (पुणे), डॉ. अविनाश आवळगावकर (पुणे), महंत कारंजेकर बाबा (अमरावती), डॉ. छाया महाजन (औरंगाबाद) यांचा सदस्य म्हणून समावेश केला आहे. मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी केलेल्या समितीने विद्यापीठ स्थापनेसाठी योग्य वाटतील, अशा बाबींसाठी विविध तज्ञ व्यक्ती आणि संस्थांची विचारविनियम करून सर्व समावेशक तपशील दोन महिन्यांत राज्य सरकारला सादर करायचा आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अ. म. बाविस्कर यांनी अध्यादेशात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT