maharashtra weather update low pressure formed in Bay of Bengal imd predicted rains will active again sakal
पुणे

Maharashtra Weather Update : राज्यात पाऊस पुन्हा होणार सक्रिय

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते पश्चिम आणि उत्तर-पश्चिमेकडे सरकण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सर्वत्र मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यात बुधवारपासून (ता. ६) तर राज्यात गुरुवार (ता. ७) आणि शुक्रवारी (ता. ८) बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. याशिवाय कोकण किनारपट्टीलगत बुधवारपासून पावसाचा जोर वाढणार आहे.

कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्यासह नाशिक, सातारा जिल्ह्यातील घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. भंडारा, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यात बुधवारी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. कमी दाबाचे क्षेत्र विदर्भाकडून मराठवाड्याकडे सरकरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मराठवाड्यातही दोन दिवसांत पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज वर्तविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: शतक झळकावल्यावर विराट कोहलीचा मैदानावर नागीण डान्स, Video होतोय तुफान व्हायरल

Latest Marathi News Live Update : तपोवiनातील वृक्षतोडीविरोधात सीटू संघटना आक्रमक; आंदोलनाला मिळतोय वाढता पाठिंबा

Sushma Swaraj: सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांचे निधन; ज्येष्ठ वकील, माजी राज्यपाल अन्... 'अशी' होती कारकिर्द

Bharat Taxi Launch : झिरो कमिशनसोबत ‘भारत टॅक्सी’ सेवा लॉन्च; मिळणार अल्प दरात राइड्स, जाणून घ्या दर आणि बुकिंग प्रक्रिया

Ashes: मिचेल स्टार्कनं इतिहास घडवला; हॅरी ब्रुकची विकेट घेऊन वसिम अक्रमचा विक्रम मोडला, पाकिस्तानी दिग्गज म्हणाला...

SCROLL FOR NEXT