Nanasaheb Parulekar Jayanti 2023
पुणे : सकाळचे संस्थापक संपादक डॉ. नानासाहेब परूळेकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त निसर्गवेड्यांशी एका अनोख्या संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. जल, जंगल आणि गिरीशिखरे या विषयावर बुधवारी (ता.२०) सायंकाळी पाच वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे ही मुलाखत रंगणार आहे. त्यामुळे आजच मोबाईलमध्ये बुधवारची संध्याकाळ ही ‘सेव्ह द डेट’ म्हणून निश्चित करा. (Nanasaheb Parulekar 2023 Awards Pune)
परुळेकर जयंतीनिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमात पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे, निसर्ग अभ्यासक भाऊ काटदरे, गिर्यारोहक उमेश झिरपे संवाद साधणार आहे. निसर्गाच्या सानिध्यातील त्यांचे रोमांचकारी अनूभव आणि निसर्ग संवर्धनाचा अनोखा प्रवास यावेळी उलगडेल. या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार (कै.) ना. अ. पेंडसे पुरस्कृत डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कारांचे वितरण होईल. हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात होईल. नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.