Crime News esakal
पुणे

Pune: "नवरा नीट सांभाळत नाही?माझ्याशी लग्न कर", एकतर्फी प्रेमातून महिलेवर वार; आरोपीला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

CD

पुणे, ता. २६ : एकतर्फी प्रेमातून महिलेवर कोयत्याने वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी हा निकाल दिला.


अरुणकुमार राजकुमार साहू (वय २२, रा.कल्याणीनगर, मूळ रा. सालेपूर, बिहार) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. २२ मार्च २०१६ कल्याणीनगरमधील एका सोसायटीत आरोपीने महिलेवर हल्ला केला होता. तक्रारदार महिला आणि आरोपी हे दोघेही एकाच सोसायटीत काम करत होते. तिथेच साहूची महिलेशी ओळख झाली.

घटनेच्या दिवशी महिला काम संपवून घरी निघाली होत्या. तेव्हा साहू याने तिला अडवले व म्हणाला की, तुझा नवरा तुला नीट सांभाळत नाही. तू माझ्याशी लग्न कर. त्यावर महिलेने त्याला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे साहू याने ‘तुला खल्लास करतो’ असे म्हणत महिलेवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला.

या खटल्याचे कामकाज सरकारी वकील संतोषकुमार पताळे आणि ॲड. शुभांगी देशमुख यांनी पाहिले. पोलिस अधिकारी आर. बी. लोखंडे यांनी गुन्ह्याचा तपास केला. तर येरवडा पोलिस ठाण्याचे हवालदार मोहन गिरमे आणि विनोद कायगुडे यांनी तपासात मदत केली. दंडाची रक्कम महिलेला देण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT