पुणे

पॅन कार्ड आधार क्रमांकाशी जोडण्यास मुदतवाढ केंद्र सरकारची घोषणा ः आता येत्या ३० जूनपर्यंत लिंक करता येणार

CD

पुणे, ता. २९ ः केंद्र सरकारने पॅन कार्ड आधार क्रमांकाशी जोडण्यास आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. या मुदतवाढीची घोषणा मंगळवारी (ता.२८) दुपारी पाच वाजता करण्यात आली. यामुळे नागरिकांना आता एक हजार रुपये शुल्कासह येत्या ३० जूनपर्यंत आपले पॅनकार्ड हे आधार क्रमांकाशी जोडता येणार आहे.

याआधी यासाठी ३१ मार्च २०२३ ही अंतिम मुदत दिली होती. यासाठी याआधी चार वेळा मुदतवाढ दिल्याने, आता मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे प्राप्तीकर विभागाने स्पष्ट केले होते. ‘पॅन कार्डच्या वैधतेसाठी उरले शेवटचे तीन दिवस’ असे वृत्त मंगळवार (ता. २८) ‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेऊन केंद्र सरकारने मुदतवाढीची घोषणा केली.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) याबाबतचा निर्णय २०१७ मध्येच घेतला होता. या निर्णयानुसार हे कार्ड आधार क्रमांकाशी जोडण्यासाठी पहिल्यांदा ३१ मार्च २०२० ही अंतिम मुदत दिली होती. परंतु, देशात मार्च २०२० पासून सुरू झालेल्या कोरोना संसर्गामुळे यासाठी दोन वर्षांची मुदतवाढ देऊन, याची अंतिम तारीख ही ३० मार्च २०२२ अशी निश्‍चित केली होती. या तारखेपर्यंत पॅन हे आधार क्रमांकाशी विनाशुल्क (मोफत) जोडले जात असे. मात्र, ही दुसरी मुदतवाढ संपल्यानंतर तिसऱ्यांदा तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. परंतु, या तिसऱ्या मुदतीत प्रत्येकी ५०० रुपये शुल्क आकारले जात असे. ही मुदत ३० जून २०२२ रोजी संपली आहे. त्यानंतर १ जूलै २०२२ पासून ३१ मार्च २०२३ पर्यंत शेवटची मुदतवाढ दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT