पुणे

औद्योगिक सुरक्षेबाबत जागृती

CD

पुणे, ता. ३० : राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह आणि स्पेक्ट्रम सुरक्षा वर्षानिमित्त रंग उद्योगाची शिखर संस्था असलेल्या ‘स्पेक्ट्रम सेफ्टी कौन्सिल’तर्फे सुरक्षा अभियान राबविण्यात आले. गेल्या १५ वर्षांपासून हा उपक्रम करण्यात येत आहे, अशी माहिती स्पेक्ट्रम संस्थेचे अध्यक्ष आणि रंग तंत्रज्ञ पंकज शाह यांनी दिली. ५२ व्या जागतिक सुरक्षा सप्ताहाच्या समारोप दिनानिमित्त कौन्सिलतर्फे टीआयपी ऑडिटोरिअममध्ये लीन सेफ्टी या विषयावर एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
कोटिंग मॅनेजमेंट सल्लागार डॉ. ए. जे. सिंग, कॉर्पोरेट ट्रेनर उज्ज्वल तावडे, टीआयपीचे प्राचार्य डॉ. आर. एच. डोंगरे आणि कोरोकोट पॉलिमर्सचे लीन चॅम्पियन किरण गोंधळी यावेळी उपस्थित होते. डॉ. डोंगरे यांनी सर्व स्तरावर सुरक्षेची जाणीव आणि सुरक्षेचे महत्त्व निर्माण करण्यासाठी अशा सेमिनारची उपयुक्तता, उपयोगिता आणि आवश्यकता याबद्दल माहिती दिली. डॉ. सिंग यांनी रिजेक्शन कमी करण्यासाठी, गुणवत्ता सुधारण्यासाठी, उत्पादकता वाढवण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षा मूल्य वाढविण्यासाठी लीन तत्त्वे आणि त्याचा उपयोग याविषयी मार्गदर्शन केले. तर तावडे यांनी त्यांचा प्रवास मांडला. शाह यांनी सुरक्षेसाठी बांधिलकी आणि प्रतिनिधींमध्ये सुरक्षिततेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी सुरक्षा शपथ आणि प्रतिज्ञा दिली. त्यांनी कौन्सिलच्या गेल्या १५ वर्षांच्या प्रवासाची माहिती दिली. समन्वयक सतीश चव्हाण यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT