पुणे

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ७३ कोटींची नुकसान भरपाई

CD

पुणे, ता. १ : पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे आणि फळपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी ७३ कोटी ६० लाख ३८ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. अतिवृष्टीमध्ये किमान ३३ टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने या नुकसान भरपाईचे वाटप सुरु केले असून आतापर्यंत ८० टक्के वाटप पूर्ण झाले आहे. याचा जिल्ह्यातील ८५ हजार ४४५ शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे यांनी सांगितले.

दरम्यान, यंदाच्या मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ८४ गावांतील १ हजार ४३४ शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील ४०८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यासाठी ७० लाख ७० हजार रुपयांचे अनुदानाची मागणी करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या अतिवृष्टीमुळे भोर तालुक्यातील ७८ गावांमधील ५२३ शेतकऱ्यांना २३ लाख १० हजार रुपये, वेल्हे तालुक्यातील ११ शेतकऱ्यांना ३९ हजार रुपये, मावळ तालुक्यातील ११४ शेतकऱ्यांना ३ लाख २६ हजार रुपये, हवेली तालुक्यातील ७ हजार ४९० शेतकऱ्यांना ८ कोटी ३३ लाख २ हजार रुपये, खेड तालुक्यातील १ हजार ९४७ शेतकऱ्यांना २ कोटी २ लाख २३ हजार रुपये, आंबेगाव तालुक्यातील ९ हजार ७७९ शेतकऱ्यांना ४ कोटी ९६ लाख ६९ हजार रुपये, जुन्नर तालुक्यातील २२ हजार ५९१ शेतकऱ्यांना २४ कोटी ५१ लाख ४६ हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे.
शिरूर तालुक्यातील ४ हजार ७३४ शेतकऱ्यांना ४ कोटी ५६ लाख ६६ हजार रुपये, पुरंदर तालुक्यातील २७ हजार ८४१ शेतकऱ्यांना २१ कोटी २६ लाख ५७ हजार रुपये, दौंड तालुक्यातील २ हजार ८ शेतकऱ्यांना २ कोटी १४ लाख ८० हजार रुपये, बारामती तालुक्यातील ८ हजार ४१७ शेतकऱ्यांना ५ कोटी ५२ लाख २० हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
याशिवाय जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शेती पिकाच्या नुकसानीसाठी ३ कोटी १४ लाख २१ हजार रुपये आणि शेतजमीन खरडून झालेल्या नुकसानीपोटी १३ लाख ६४ हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT