पुणे

‘आकृती’ चित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन

CD

पुणे, ता. २ ः ‘आकृती’ या महिला चित्रकारांनी भरविलेल्या २४ व्या चित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन ज्येष्ठ आर्किटेक्ट प्रकाश काण्हेकर यांच्या हस्ते नुकतेच झाले. याप्रसंगी पुणे फेस्टिवलचे विश्वस्त रवींद्र दुर्वे, व्यावसायिक सुभाष सूर्यवंशी, राजेंद्र माहुलकर, ज्येष्ठ चित्रकार शैलेश सोनवणे, स्मिता राजे, नीलिमा मळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनात राज्यभरातील तसेच इतर राज्यातील चित्रकारांचीही विविध विषयांवरील चित्रे प्रदर्शित केले. हे प्रदर्शन सोमवारपर्यंत (ता. ३) बालगंधर्व कलादालन येथे सर्वांसाठी खुले आहे.

आयसीसीआर आणि ललित कला केंद्रातर्फे मैफल
पुणे, ता. २ ः भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातर्फे आयोजित संगीत मैफिलीत निनाद शुक्ल यांचे गायन व शंतनू गोखले यांचे सतारवादन झाले. मेवाती घराण्याचे गायक असलेले शुक्ल यांनी राग पुरिया कल्याण सादर केला. त्यानंतर कलावती रागात दोन बंदिशी प्रस्तुत केल्या. त्यांना तबल्यावर उल्हास कुलकर्णी, संवादिनीवर सुखदा पटवर्धन आणि तानपुऱ्यावर स्वाती शुक्ल यांनी साथसंगत केली. यानंतर शंतनू गोखले यांचे सतारवादन झाले. त्यांनी सुरवातीला पहाडी धून वाजवली. त्यानंतर राग रागेश्री प्रस्तुत केला. त्यामध्ये आलाप जोड झाला आणि झपताल व तीनतालातील दोन गती सादर केल्या. कलाकारांचा सत्कार विद्यापीठाचे प्र-कुलगुरू संजीव सोनवणे यांनी केला.

विनामूल्य नृत्योपचार कार्यशाळांचे आयोजन
पुणे, ता. २ ः ‘नृत्य प्रेरणा स्कूल ऑफ भरतनाट्यम्’ या संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात चार विनामूल्य नृत्योपचार कार्यशाळांचे आयोजन केले आहे. हा महिना जागतिक नृत्य महिना साजरा करण्यात येत असल्याचे औचित्य साधून या कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. या कार्यशाळांमध्ये गुरू सुचित्रा दाते यांनी विकसित केलेल्या ‘सुचित्रा नृत्य थेरपी - नृत्योपचार’ याच्या सत्रांचा समावेश असेल. एप्रिल महिन्यातील दर शनिवारी सायंकाळी ६.१५ ते ७ या वेळेत पर्वती परिसरातील मित्र मंडळ कॉलनी येथील प्लॉट क्रमांक ८८ येथे या कार्यशाळा होतील.

विकास जोशी यांच्या पुस्तकाला पुरस्कार
पुणे, ता. २ ः लेखक विकास जोशी यांना चंदिगढ येथील ‘ए३ फाऊंडेशन’तर्फे नुकताच साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. जोशी यांनी लिहिलेल्या ‘माय नेम इज सिनॅमन’ या पुस्तकासाठी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. जोशी यांचे पहिलेच पुस्तक आहे. चंदिगढ येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ‘‘माझे आई-वडील आणि कुटुंबातील सदस्यांना मी हा पुरस्कार समर्पित करतो. तसेच, पुण्याच्या उत्साही, सर्जनशील व कलात्मक समुदायाला मी हा पुरस्कार समर्पित करतो’’, अशी भावना जोशी यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT