पुणे

विद्यापीठातील बी. व्होकच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप प्रदान

CD

पुणे, ता. २४ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बी. व्होकमधील रिटेल मॅनेजमेंटच्या २९ विध्यार्थ्यांना इंटर्नशिपचे पत्र प्रदान करण्यात आले. विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर यांच्या हस्ते आणि कौशल्य विकास केंद्राचे संचालक डॉ. राधाकृष्ण पंडित, अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. रवी आहुजा, डॉ. धनंजय मुंडे, रितु छाब्रा तसेच मारुती सुझुकी समूहाचे गुडगाव येथील व्यवस्थापक योगेश श्रीवास्तव, अंकुर डिगरा, सुशील वैद्य आणि पुण्यातील मारुती सुझुकी समूहाचे वितरक यांच्या उपस्थितीत हे पत्र प्रदान करण्यात आले.

शिंगणापूरकर म्हणाले, ‘‘विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राच्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत आहे. यामार्फत स्वावलंबी बनत त्यांना अर्थार्जनाची संधीही प्राप्त होत आहे. भविष्यात यामध्ये विविध उद्योग समूहासोबत सामंजस्य करार करून याचा विस्तार करण्यात येईल.’’ विद्यापीठाने मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड सोबत सामंजस्य करार करत नवीन बी. व्होक रिटेल मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम २०२१ - २२ पासून सुरू केला आहे. यावर्षी या अभ्यासक्रमामार्फत दुसऱ्या बॅचला लेटर ऑफ इंटर्नशिप प्रदान झाल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष काम करत शिक्षण घेण्याची संधी प्राप्त झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT