पुणे

हाडांचे आजार टाळण्यासाठी जीवनशैली बदला : डॉ. तुषार दाते

CD

हाडांचे आजार टाळण्यासाठी
जीवनशैली बदला : डॉ. दाते

पुणे, ता. २७ ः ‘‘बदलती जीवनशैली, चालण्याच्या, उठण्याच्या व बसण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोकांमध्ये हाडांशी संबंधित आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतात. हाडांच्या मजबुतीसाठी सर्वांनी कोवळ्या उन्हात बसणे, कॅल्शिअमयुक्त पदार्थांचे सेवन आणि दैनंदिन जीवनशैलीमध्ये कालानुरूप संतुलन ठेवणे गरजेचे आहे,‘‘ असा सल्ला अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. तुषार दाते यांनी दिला.
कोथरूड हॉस्पिटल आणि श्री संताजी प्रतिष्ठान यांच्यातर्फे विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. शिबिरात १८० नागरिक सहभागी झाले. शिबिरात हाडांच्या आजारांचे निदान व उपचार करण्यात आले. हाडांच्या सर्व तपासण्यांसह संधीवात, अंगदुखी, मानदुखी, मणक्याचे आजार, कंबरदुखी, फ्रॅक्चर, हाडांचा ठिसूळपणा, खुब्याचे आजार, गुडघ्यांचे आजार, स्त्री रोग, कर्करोग, त्वचेचे आजार, पोटाचे विकार, छातीचे आजार व मधुमेहाची तपासणी, डी ३ जीवनसत्त्व व ईसीजी यासाठी चाचण्या करण्यात आल्या. रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र मिटकर, डॉ. राजेंद्र गुंडावार, स्त्रीरोग तज्ञ डॉ. मंजूषा प्रभुणे यांच्याबरोबर, डॉ. निखिल ओझा, व डॉ. धीरज राणे आदींनी मार्गदर्शन केले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT