MSEDCL Electricity bill esakal
पुणे

Electricity Bill Arrears : पुणे परिमंडलातील वीज ग्राहकांकडे १९१ कोटीची थकबाकी

पुणे परिमंडलातील सर्व प्रकाराच्या ७ लाख ८८ हजार ८८१ वीजग्राहकांकडे १९१ कोटी १९ लाख रुपयांची थकबाकी आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे परिमंडलातील सर्व प्रकाराच्या ७ लाख ८८ हजार ८८१ वीजग्राहकांकडे १९१ कोटी १९ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती ६ लाख ८१ हजार २०८ ग्राहकांकडे १२१ कोटी ८१ लाख, वाणिज्यिक ९६ हजार ३१६ ग्राहकांकडे ४७ कोटी ३ लाख व औद्योगिक ११ हजार ३५७ ग्राहकांकडे २२ कोटी ३५ लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी त्वरित भरण्याचे आवाहन महावितरणकडून केले आहे.

दरम्यान, वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (ता. २७) व रविवारी (ता. २८) सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे. सोबतच लघुदाब वीजग्राहकांना बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाइट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाइन’ सोय उपलब्ध आहे.

पुणे शहरात घरगुती ३ लाख २ हजार २३२ ग्राहकांकडे ४८ कोटी १८ लाख, वाणिज्यिक ४८ हजार ३५२ ग्राहकांकडे १९ कोटी ७८ लाख रुपये, औद्योगिक ३ हजार १३९ ग्राहकांकडे २ कोटी ३४ लाख रुपयांची थकबाकी आहे. पिंपरी चिंचवड शहरात घरगुती १ लाख ३६ हजार ९१३ ग्राहकांकडे २६ कोटी १७ लाख, वाणिज्यिक २२ हजार १४९ ग्राहकांकडे ११ कोटी ५७ लाख, औद्योगिक ४ हजार २२६ ग्राहकांकडे १० कोटी ९९ लाख रुपयांची थकबाकी आहे.

तसेच ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये घरगुती २ लाख ४२ हजार ६३ ग्राहकांकडे ४७ कोटी ४५ लाख, वाणिज्यिक २५ हजार ८१५ ग्राहकांकडे १५ कोटी ६८ लाख, औद्योगिक ३ हजार ९९२ ग्राहकांकडे ९ कोटी १ लाख रुपयांची थकबाकी आहे. वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: शुभमन गिलला चेंडू लागला, उपचार घेण्यासाठी धावला! भारताच्या सराव सत्रात आज बरंच काही घडलं, वाचा...

पुरस्कार सोहळ्यात नाना पाटेकरांनी माधुरीची घेतली फिरकी, म्हणालेले... 'तुला खुप मिळाले पण...'

Shiv Sena Symbol Case :'शिवसेने'वर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, एकनाथ शिंदे दरे गावी | Eknath Shinde

Marathi News Live Updates : जर आयोगाने त्या घटनेनुसार असलेल्या संघटनात्मक रचनेची तपासणी केली असती, तर केवळ विधिमंडळातील बहुमताच्या आधारे हा वाद सोडवणे त्यांना कधीच शक्य झाले नसते - सिब्बल

Retired Cricketer Pension : सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग की सौरव गांगुली, कोणाला मिळते सर्वाधिक निवृत्तीवेतन?

SCROLL FOR NEXT