पुणे

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसासाठी पोषक हवामान

CD

पुणे, ता. २७ ः अरबी समुद्रात येत असलेली आर्द्रता, वायव्य राजस्थान व परिसरावर असलेले चक्राकार वाऱ्यांची स्थिती, त्यात या प्रणालीपासून उत्तर मध्य प्रदेशपर्यंत निर्माण झालेला हवेचा कमी दाबाचा पट्टा. अशात राज्यात काही भागात पूर्व मोसमी पावसासाठी पोषक हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

राज्यातील कमाल तापमानाचा पारा खाली घसरत असून उन्हाबरोबर दमट व ढगाळ वातावरणामुळे उकाडा कायम आहे. मराठवाडा आणि विदर्भात बहुंताश ठिकाणी पारा ४० अंशांच्या घरात असून शनिवारी (ता. २७) राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद चंद्रपूर येथे ४३ अंश सेल्सिअस इतकी झाली. मॉन्सूनची प्रगती ही अद्याप झालेली होत नसून गेल्या आठवडाभरापासून ते ‘जैसे थे’ स्थितीत आहे. दरम्‍यान, यातच राज्यात पावसासाठी अनुकूल स्थिती होत आहे. तर किमान तापमानात ही सरासरीपेक्षा घट पाहायला मिळत आहे.
रविवारी (ता. २८) मराठवाडा आणि मध्‍य महाराष्‍ट्रातील तुरळक ठिकाणी विजांसह हलक्‍या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून उर्वरित राज्यात मात्र उन्हाची स्थिती असेल.

पुण्यात आठवडाभर उकाडा
पुणे शहर आणि परिसरात पुढील आठवडाभर मुख्‍यतः निरभ्र वातावरण राहणार असून दुपारनंतर ढगाळ वातावरणाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या शहरातील कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा कमी नोंदला जात आहे. शनिवारी (ता. २७) शहरात ३५.६ अंश सेल्सिअस इतकी झाली. ऊन आणि दमट वातावरणामुळे उकाड्याची अनुभूती नागरिकांना पुढील आठवडाभर अशीच होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

SCROLL FOR NEXT