पुणे

पालखी सोहळ्यासाठी आरोग्य, स्वच्छतेवर भर

CD

पुणे, ता. २८ : शहरात पालखी सोहळ्यादरम्यान पुणे महापालिकेकडून आरोग्य व स्वच्छतेवर सर्वाधिक भर देण्यात येणार आहे. त्यासाठी १,३००हून अधिक फिरती स्वच्छतागृहे व पालखी मार्गावर १८ ठिकाणी मोफत औषध पुरवठा व उपचार केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबरोबरच महिला कक्ष तयार ठेवण्याबरोबरच महिलांना सॅनिटरी नॅपकीनचे वाटप केले जाणार आहे. अशा प्रकारे महापालिकेच्या विविध विभागांकडून वारकऱ्यांसह भाविकांच्या सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न केले जात आहेत.
श्री संत ज्ञानेश्वर व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे १२ जून रोजी पुण्यात आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून पालखी मार्गावर आवश्‍यक सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीच्या आवश्‍यक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामध्ये सर्वाधिक आरोग्य व स्वच्छतेवर भर दिला आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून पालखी मार्गावर ठिकठिकाणी सुमारे १,३३१ फिरती स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच ६५० कर्मचारी व आणखी ६० अतिरिक्त कर्मचारी स्वच्छतेसाठी देण्यात येणार आहे. पालखी मार्ग स्वच्छतेबाबतच्या सूचना संबंधित क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.

संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी मुक्कामाच्या ठिकाणी महिला विश्रांती कक्षाची स्थापन करण्यात येणार आहे. तेथे महिला भाविकांना विश्रांती करता येणार आहे. याबरोबरच महापालिकेकडून महिलांच्या आरोग्यासाठी सुमारे पाच हजारहून अधिक सॅनिटरी नॅपकीनचेही वाटप केले जाणार आहे. याबरोबरच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी सातत्याने स्वच्छता ठेवण्यात येणार आहे.
-आशा राऊत, प्रमुख, घनकचरा व्यवस्थापन विभाग

महापालिकेकडून १६ ते १८ ठिकाणी मोफत औषध पुरवठा व उपचार केंद्र असणार आहेत. हे केंद्र पालखी मार्ग, मुक्काम स्थळावर असणार आहेत. ठिकठिकाणी औषधे, रुग्णवाहिका व तत्काळ उपचारांसाठी व्यवस्था केली जाईल. त्याबाबतच्या सूचना महापालिकेच्या दवाखान्यांमधील वैद्यकीय प्रमुखांना दिल्या आहेत.
-डॉ. संजय वावरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, महापालिका

या ठिकाणी असतील उपचार केंद्र
खेडेकर दवाखाना (बोपोडी), दळवी हॉस्पिटल (वाकडेवाडी), कळस दवाखाना (म्हस्के वस्ती कोठी), सिद्धार्थ दवाखाना (विश्रांतवाडी चौक), राजीव गांधी दवाखाना (येरवडा), दळवी हॉस्पिटल (शिवाजीनगर), होमी भाभा हॉस्पिटल (फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता), गाडगीळ दवाखाना (टिळक चौक), मालती काची दवाखाना (समाधान चौक, लक्ष्मी रस्ता), गणेश पेठ दवाखाना, सोनवणे हॉस्पिटल, डॉ. आंबेडकर दवाखाना (भवानी पेठ), शिवरकर दवाखाना (फातिमानगर चौक), छत्रपती शाहू दवाखाना (रामटेकडी बसस्टॉप), अण्णासाहेब मगर दवाखाना (हडपसर), कोद्रे प्रसूतिगृह (मुंढवा), भानगिरे दवाखाना (महमदवाडी).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"आम्हाला, त्याची गरज होती, आम्ही आनंदी..."! पाकड्या अबरारला करारबद्ध करण्याचा SRH कडून बचाव; विसरले, भारताचा केलेला अपमान

LPG Crisis: गॅस टंचाईवर ८० लाख लिटर केरोसीनचा ‘बॅकअप’ प्लॅन तयार, काळाबाजारावर योगींची कारवाई

Pune-Bangalore Highway Accident : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात; शिरोली पुलाजवळ, भरधाव मोटार बॅरिकेड्सला धडकली

Bike Accident: पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Xiaomi 17 Price : भारतात लाँच झाला शाओमी 17 स्मार्टफोन; पाहा किंमत अन् दमदार फीचर्स..

SCROLL FOR NEXT