पुणे

सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांना मिळणार श्रेणी

CD

औषधे, डॉक्टरांचा स्टेथोस्कोप अशा इमेज टाकणे
---
सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांना मिळणार श्रेणी
उपचारांची गुणवत्ता सुधारण्यासाठी विश्लेषण कक्ष स्थापन
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २८ ः उपचारांची गुणवत्ता सुधारण्यासाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांना आता श्रेणी पद्धत लागू करण्यात येईल. त्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या स्तरावर विशेष कृती नियंत्रण व विश्लेषण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याद्वारे प्रत्येक सरकारी महाविद्यालयाच्या कामाचा आढावा घेण्यात येत आहे.
शैक्षणिक आणि आरोग्य सेवा तसेच सुविधा सुधारण्याचाही यामागील उद्देश आहे. कक्षात सात सदस्य आहेत. सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले हे अध्यक्ष असून मुंबईतील जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, न्यायवैद्यकतज्ज्ञ प्रा. डॉ. गजानन चव्हाण, विशेष कार्य अधिकारी डॉ. मंदार सदावर्ते, कार्यालयीन अधिक्षक विनय सावंत, वरिष्ठ सहायक स्वप्नील देसाई, वरिष्ठ सल्लागार महोम्मदअली खोराजिया
यांचा यात समावेश आहे.

उद्देश काय?

महाराष्ट्र हे वैद्यकीय शिक्षणातील अग्रगण्य राज्य आहे. राज्यातील २३ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालये आहेत. महाविद्यालयातील शिक्षण व्यवस्था आणि रुग्णालयांमधील रुग्णसेवा याची गुणवत्ता सातत्याने सुधारणे कृती नियंत्रण आणि विश्लेषण कक्ष स्थापन करण्यामागचे प्रमुख उद्देश आहे. वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय, कर्मचारी आणि विद्यार्थी तसेच, प्रशासकीय विभाग या चार घटकांवर वैद्यकीय सेवेची गुणवत्ता टिकून असते. त्यात सातत्य असणे आवश्यक असते. त्यासाठी वेळोवेळी महाविद्यालयातील कामकाजाबाबत आढावा घेण्याची व्यवस्था यात करण्यात आली आहे.

समस्यांच्या मुळापर्यंत जाण्यास मदत
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांच्याशी संलग्न रुग्णालयांपुढील समस्या वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे कमी श्रेणी मिळालेल्या महाविद्यालयांच्या नेमक्या समस्या यातून पुढे येतील. त्या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्या मुळापर्यंत जाण्याचा मार्ग कृती नियंत्रण आणि विश्लेषण कक्षातून मिळणार आहे.

काय होणार?

१. दर महिन्याला सरकारी वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा
२. दैनंदिन कामकाजात येणाऱ्या नेमक्या अडथळ्यांचे विश्लेषण
३. कामकाज सुधारण्यासाठी कृती आराखडा तयार करणे
४. विकसित केलेल्या कार्यक्षमतेची पुनर्विलोकनाच्या पद्धतीने माहिती संकलन
५. संकलित माहितीच्या विश्लेषणावरून महाविद्यालयाला श्रेणी मिळणार

विश्लेषणाचे ठळक निकष
- एका महिन्यातील शस्त्रक्रियांची संख्या
- शल्यचिकित्सकांची उपलब्धता
- प्रधानमंत्री जनआरोग्य आरोग्य योजनेतून संकलित निधीचे प्रमाण
- क्लिनिकल फॅकल्टी किती आहेत
- ‘ई-औषधी‘मधून किती टक्के औषधांची खरेदी
- एकूण औषधांची खरेदी किती
- अखेरच्या तिमाहीमध्ये औषधांवरचा खर्च किती
- वार्षिक निधी

......
भविष्यात वैद्यकीय सेवा ज्यांच्या हातात सोपवायची आहे त्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. त्याचा दर्जा नेमका कसा आहे, हे ‘परफॉर्मन्स मॉनिटरिंग अँण्ड ॲनॅलिसिस सेल''च्या (पीएमएसी) माध्यमातून तपासण्यात येईल. रुग्णसेवेची गुणवत्ता तपासण्याचे निकषही निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे महाविद्यालय आणि रुग्णालय यांचे सर्वंकष विश्लेषण होईल. त्याचा थेट फायदा सामान्य रुग्णांना मिळणारी वैद्यकीय सेवेचा दर्जा सुधारण्यात होईल.
- डॉ. अजय चंदनवाले, सहसंचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग
.......

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT