पुणे

पबमध्ये प्रवेश न दिल्यावरून वेटरवर हत्याराने वार

CD

पबमध्ये प्रवेशावरून
युवकांचा वेटरवर हल्ला

पुणे, ता. २८ : पबमध्ये मध्यरात्री प्रवेश न दिल्याच्या कारणावरून तीन युवकांनी एका वेटरवर हत्याराने हल्ला केला. हा प्रकार मुंढवा परिसरात एबीसी रस्त्यावरील ताडीगुत्त्याजवळ शनिवारी (ता. २७) मध्यरात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास घडला.
या प्रकरणी वेटर धीरेंद्र अवदेश चौहान (वय २७, रा. धायरकर कॉलनी, मुंढवा) याने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी अबीद युसुफ खान (वय २०, रा. लोहियानगर) याला अटक करून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. धीरेंद्र हा सहकारी विक्रम उदाइन याच्यासोबत पायी जात होता. त्यावेळी आरोपी अबीद आणि त्याचे दोन साथीदार तेथे आले. त्यापैकी दोघांनी विक्रमला पकडून ठेवले. एकाने धीरेंद्रला जाब विचारत त्याच्या पाठीवार आणि डोक्यावर हत्याराने वार केले. धीरेंद्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप जोरे करीत आहेत.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT