पुणे

पुण्यात पूर्वमोसमी पावसाची हजेरी

CD

पुणे, ता. २९ : उन्हाच्या तीव्र झळा आणि दमट वातावरणामुळे उकाड्याने घामाघूम झालेल्या पुणेकरांना सोमवारी मात्र पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी चांगलेच भिजवले. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) स्थिती ‘जैसे थे’ असताना राज्यासह पुणे शहर आणि परिसरात पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी हजेरी लावली.

दरम्‍यान, मंगळवारी (ता. ३०) सुद्धा शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. सोमवारी (ता. २९) शहरात ऊनसावलीचा खेळ सुरू होता. त्यात दुपारनंतर मात्र शहरासह उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झाली. काही भागांत तर मेघगर्जना, गारांसह पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी पडल्या. अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांचीही तारंबळ उडाली होती. शिवाजीनगर, बाणेर, बालेवाडी, कोथरूड, खराडी, विश्रांतवाडी व इतर भागांत पावसाची नोंद झाली. तर औंध, सकाळनगर, पंचवटी, पाषाण, सूसगाव आदी परिसरात गारांचा पाऊस झाला. शहरात ४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, मंगळवारी (ता. ३०) ही शहर आणि परिसरात काही ठिकाणी पावसाची शक्यता कायम आहे.

जिल्ह्यात पारा पुन्हा ४० अंशांवर
चाळिशीच्या खाली आलेला कमाल तापमानाच्या पाऱ्यात आता पुन्हा वाढ झाली असून, जिल्ह्यातील काही भागांमध्ये पारा ४० ते ४२ अंशांच्या दरम्यान होता. शहरातील कमाल तापमानातही मागील तीन ते चार दिवसांच्या तुलनेत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सोमवारी शहरात ३९.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तापमानात सरासरीपेक्षा ३ अंशांनी वाढ झाली होती. दुपारनंतर झालेल्या पावसामुळे मात्र उन्हाचा ताप व उकाड्यातून काहीशी सुटका झाली.

पुण्यात विविध ठिकाणी झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
पुणे शहर : ४
लोहगाव : ०.२
पाषाण : ६.५
भोर : १३.५
तळेगाव ढमढेरे : ०.५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT