Katraj-Kondhwa road sakal
पुणे

Land Acquisition : कात्रज-कोंढवा रस्त्याचे भूसंपादन ऑक्टोबरपूर्वी करणार - विक्रम कुमार

भूसंपादनामुळे रखडलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी ऑक्टोबरपूर्वी जागा ताब्यात घेऊन लगेच त्याचे काम सुरू करू, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - भूसंपादनामुळे रखडलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी ऑक्टोबरपूर्वी जागा ताब्यात घेऊन लगेच त्याचे काम सुरू करू, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले. मात्र, राज्य सरकारकडून मंजूर झालेले २०० कोटी रुपये अद्याप महापालिकेच्या तिजोरीत जमा न झाल्याने भूसंपादन कसे करणार, हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

कात्रज-कोंढवा रस्ता सध्या ३२ मीटरचा असला तरी तो अपुरा आहे. त्यामुळे महापालिकेने ८४ मीटरपर्यंत रुंदीकरणाचा निर्णय घेतला. मात्र भूसंपादनाअभावी गेल्या पाच वर्षांत केवळ २८ टक्के काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यात ज्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांनी महापालिकेकडे रोख नुकसानभरपाई मागितलेली आहे. ‘टीडीआर’, ‘एफएसआय’च्या रूपात मोबदला घेण्यास जागामालकांनी नकार दिला आहे.

महापालिकेला या प्रकल्पासाठी २ लाख ८८ हजार चौरस मीटर जागा आवश्‍यक असून, अद्याप १ लाख २८ हजार चौरस मीटर जागेचे भूसंपादन झालेले नाही. त्यामुळे हे काम ठप्प आहे. जागामालकांना रोख मोबदला देता यावा, यासाठी महापालिकेने ८४ मीटरऐवजी ५० मीटरचा रस्ता विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. भूसंपादनासाठी २८० कोटी रुपये आवश्‍यक आहेत. त्यातील २०० कोटी रुपये राज्य सरकार देणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच २०० कोटी रुपये मंजूर केल्याचे पुण्यात बोलताना स्पष्ट केले होते. पण हा निधी अद्याप महापालिकेच्या तिजोरीत जमा झालेला नाही. त्यामुळे महापालिका भूसंपादन कसे करणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

महापालिकेच्या भूसंपादन विभागाने रुंदीकरणात ज्या जागा मालकांचे भूखंड येतात, त्यांची यादी तयार केली आहे. त्यानुसार शासकीय नियमाने त्यांना मोबदला दिला जाणार आहे.

कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपदनासाठी २०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत, हे पैसे लवकरच मिळतील. जागामालकांची यादीही तयार केली आहेत. पैसे मिळताच भूसंपादनाची प्रक्रिया ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केली जाईल. त्यानंतर रस्त्याचे काम सुरू होईल. पुढील काही महिन्यांत कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरणाचे काम पूर्ण होऊ होईल.

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पादुका दर्शनासाठी सज्ज होतोय 'भक्तीचा महाकुंभ'; वरळीच्या NSCI डोममध्ये उद्यापासून उत्सवाला होणार सुरुवात

Solapur LPG Misuse: साेलापूरात घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे; अन्नधान्य वितरण विभागाचे छापे, हॉटेल व्यावसायिक रडारवर!

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

Beed News: मानवत: घरासमोरील ऑटो रिक्षा पेटवली; १.४० लाखांचे नुकसान; पंधरा दिवसांतील दुसरी वाहन आग; कृष्ण मंदिर परिसर हादरला

Chhtrapati Sambhajinagar: वादळी पावसामुळे शहर अंधारात; ३०० महावितरण कर्मचारी रात्रभर दुरुस्तीवर

SCROLL FOR NEXT