पुणे

मणिपूर येथील परिस्थिती सुधरण्यास वेळ ः सरसेनाध्यक्ष जनगरल अनिल चौहान

CD

मणीपूरसाठी केंद्र, राज्य
योग्य पावले टाकतील

सरसेनाध्यक्ष जनरल चौहान यांचे प्रतिपादन

पुणे, ता. ३० ः मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अजून थोडा वेळ लागणार आहे. ती पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकार योग्य पावले टाकतील, असे सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी सांगितले.
मंगळवारी एनडीएमध्ये पार पडलेल्या दिक्षान्त संचलन कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मणिपूरमधील घडामोडींबाबत ते म्हणाले, ‘‘याआधी २०२० मध्ये मणिपूरमध्ये लष्कर आणि आसाम रायफल्सच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. तेव्हा परिस्थिती आणि बंडखोरी नियंत्रणात आली. त्यामुळे तेथे तैनात करण्यात आलेल्या तुकड्या कमी करण्यात आल्या. परंतु आता परिस्थिती काहीशी वेगळा आहे. सध्या तेथे जे घडत आहे त्याचा बंडखोरीशी संबंध नाही. दोन जमातींमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे अस्थिर वातावरण निर्माण झाले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे, मात्र केंद्र सरकार योग्य पावले टाकेल.’’

थिएटर कमांडचे काम सुरू

जनरल चौहान यांनी थिएटर कमांडविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, तिन्ही दलांमध्ये समन्‍वय साधण्यासाठी थिएटर कमांडची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीची प्रक्रिया आता वेगाने सुरू आहे. यामध्ये एकत्रीकरण आणि संयुक्तता यांचा समावेश असून ही संपूर्ण प्रक्रिया करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. या संयुक्ततेसाठी आता एका दलातील अधिकाऱ्याला दुसऱ्या दलात तैनात करण्यात येत आहे. पूर्वी असे केवळ तिन्ही दलांच्या एकत्रित आस्थापना किंवा संस्थांमध्ये केले जायचे. मात्र जर बारकाईने पाहिले तर तिन्ही दलांद्वारे बऱ्याच गोष्टी, उपकरणे आदींचा सारखाच वापर होत आहे. त्यामध्ये विमाने, शस्त्रास्त्रप्रणाली आदींचा समावेश आहे. अशा प्रकारच्या बदल्यांमुळे तिन्ही दलांमधील कामकाज कशा पद्धतीने सुरू आहे याची देवाणघेवाण होईल. अशी काही पावले सध्या या अनुषंगाने उचलण्यात येत आहेत.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT