पुणे

शहरात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता

CD

मॉन्सून दोन-तीन दिवसांत
कन्याकुमारीत येण्याचा अंदाज
पुणे, ता. ३० ः गेल्या आठवडाभरापासून थांबलेली मॉन्सूनची वाटचाल अखेर पुन्हा सुरू झाली. पुढील दोन ते तीन दिवसांत मॉन्‍सून मालदीव, कन्याकुमारीसह बंगालच्या उपसागराच्या मध्य भागात पोहोचण्याची शक्यता असल्याचे हवामानशास्त्र विभागाने नमूद केले.
मॉन्सून अंदमानात सरासरी तारखेपेक्षा आठ दिवस उशिराने दाखल झाला आहे. अंदाजे तारीख २२ मे होती, मात्र १९ मे पासून मॉन्सूनचा प्रवास ‘जैसे थे’ होता.
दरम्यान, पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावत आहे. बुधवारी (ता. ३१) शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. शहरात सध्या सकाळी ऊन आणि दुपारनंतर ढगाळ वातावरणासह पाऊस असे हवामान आहे.
दरम्यान, कमाल तापमानातील वाढ मात्र कायम आहे. पुढील तीन दिवस शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणाचा, तर बुधवारी (ता. ३१) दुपारनंतर पावसाचा अंदाज आहे. पावसाच्या हजेरीमुळे दिवसा जाणवणाऱ्या उन्हाचा ताप मात्र काहीसा कमी होत आहे.
राज्यातही तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानातील चढ-उतार सुरू आहे. मंगळवारी (ता. ३०) राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद अकोला येथे ४२.७ अंश सेल्सिअस इतकी झाली. मराठवाड्यात पारा चाळीस अंशांच्या दरम्यान कायम असून त्यातच राज्यात पावसासाठी पोषक स्थिती निर्माण होत आहे. सध्या नैऋत्य राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण अंदमान समुद्रावर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती तयार झाली आहे. पश्‍चिम विदर्भापासून मराठवाडा, कर्नाटक, दक्षिण तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे बुधवारी (ता. ३१) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागासह विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
-----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT