पुणे

छतावरील सौर ऊर्जा निर्मितीला वेग

CD

पुणे, ता. १ : महावितरणकडून छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना वेग देण्यात आला असून पुणे परिमंडलात २५३.९४ मेगावॅट क्षमतेचे १० हजार १७० सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक वैयक्तिक व सोसायटीच्या घरगुती ७ हजार ५८० ग्राहकांकडील ७२ मेगावॅटच्या सौर प्रकल्पांचा समावेश आहे. तर ९६.७९ मेगावॅट क्षमतेचे आणखी ३ हजार ५८० प्रकल्पांचे काम सुरू आहे.

सध्या गणेशखिंड येथील विश्रामगृहाच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला असून त्याद्वारे अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच निवडसूचीवरील ‘सौर’च्या ४५ एजन्सीच्या प्रतिनिधींना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. सोबतच सर्व ४१ उपविभाग कार्यालयांतील सहायक अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) आणि ‘सौर’ एजन्सीजच्या प्रतिनिधींची संयुक्त कार्यशाळा नुकतीच झाली.

घरगुती ग्राहकांसाठी अनुदान
- १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के
- ३ ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के

अनुदानाचा फायदा कसा?
उदा. ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा यंत्रणेसाठी सुमारे १ लाख २४ हजार रुपये खर्च. त्यात ४० टक्के अनुदानाप्रमाणे सुमारे ४९ हजार ६०० रुपयांचे केंद्रीय वित्त सहाय्य. यामुळे संबंधित ग्राहकास प्रत्यक्षात सुमारे ७४ हजार ४०० रुपयांचा खर्च.

कार्यान्वित प्रकल्प (पुणे परिमंडल)
ग्राहक - क्षमता (मेगावॅट)
- ७,५८० घरगुती - ७२
- १,३६४ वाणिज्यिक - ३६.११
- ६४१ औद्योगिक - ११०.२८
- ५८५ इतर - ३५.५५

उभारणी सुरू असलेले प्रकल्प
ग्राहक - क्षमता (मेगावॅट)
- २,८८० घरगुती - १७.८३
- ३४३ वाणिज्यिक - १५.०१
- २२४ औद्योगिक - ५५.६४
- १३३ इतर - ८.३१

प्रकल्पांमुळे घरगुती वैयक्तिक व सोसायट्यांच्या वीजबिलांच्या खर्चात कपात होऊन त्यांना मोठा आर्थिक फायदा होत आहे. प्रकल्प उभारणीचा खर्च चार ते पाच वर्षांमध्ये भरून निघतो व त्याचा पुढे सुमारे २५ वर्ष लाभ होतो. यासह सौर प्रकल्पाच्या यंत्रणेला लावलेल्या नेटमिटरिंगद्वारे वर्षाअखेर शिल्लक वीज प्रतियुनिटप्रमाणे महावितरणकडून विकत घेतली जात आहे. वीजबिलातील आर्थिक बचत व पर्यावरणस्नेही म्हणून वीजग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जा योजनेचा लाभ घ्यावा.
- राजेंद्र पवार , मुख्य अभियंता, महावितरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Live Updates: "सरकार संवेदनाशून्य, भाजप मराठी माणसाचा खरा शत्रू" ; आदित्य ठाकरे यांचा घणाघात

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT