पुणे

मुलांमध्ये वाचन संस्कृती रूजविण्यासाठी ‘वाचन साखळी’ उपक्रम

CD

इमेज 46951
---
वाचन संस्कृतीसाठी साखळी उपक्रम
पुण्याच्या बालक पालक फाउंडेशनचा पुढाकार
पुणे, ता. १ : जिल्ह्याच्या दुर्गम भागात राहणाऱ्या अवघ्या तेरा वर्षीय अमृताला (नाव बदललेले आहे) एके दिवशी टपाल कार्यालयातून फोन आला. ती वडिलांबरोबर तेथे गेली. खाकी गणवेशातील पोस्टमन काकांनी तिचे नाव लिहिलेले पाकिट तिच्या हाती ठेवलं. ते पाहून ती अक्षरश: भारावून गेली. मोठ्या उत्सुकतेनं तिने पाकिट उघडलं आणि तिला गोष्टीचं छानसं पुस्तक मिळालं. ते ती मोठ्या आनंदाने सगळ्यांना दाखवत गेली.
होय! ग्रामीण आणि निमशहरी भागातील अमृतासारख्या मुला-मुलींना अशाप्रकारे नावाने पुस्तके पाठविण्याचा ‘वाचन साखळी’ उपक्रम बालक पालक फाउंडेशनच्या उपक्रम गेल्या वर्षापासून राबवीत आहे. विविध तालुक्यांतील शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके पोस्टाने पाठविली जातात. शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी एक जूनपासून या उपक्रमाला सुरवात झाली.
पालकांच्या मदतीने इच्छुक विद्यार्थी संस्थेशी ऑनलाइन संपर्क साधतात. गुगल फॉर्मद्वारे नावनोंदणी केली जाते. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरात त्याचा पत्ता मागविला जातो. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या दोन प्रती पाठविण्यात येतात. त्यातील एक प्रत विद्यार्थ्यांने स्वत:कडे तर दुसरी प्रत समवयस्क मित्रास किंवा मैत्रिणीस भेट द्यायची. अशा प्रकारे वाचन साखळी बनविली जाते. आवड लक्षात घेऊन लाभार्थी निवडण्यात येतात.
विद्यार्थ्यांनी दिलेले पुस्तक वाचले की नाही, हे पाहण्यासाठी पुस्तकावरील प्रतिक्रिया मागविण्यात येतात. अशाप्रकारे विद्यार्थ्यांशी अनोखे नाते तयार करण्यात येते. व्यक्तीगत आणि संस्थात्मक देणगीदारांच्या सहयोगातून उपक्रम विनामूल्य राबविण्यात येतो. यंदा एक हजार मुलांची वाचन साखळी करण्याचा संस्थेचा मानस आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक : ८८५६८६२७११
---
मुलांना पुस्तकांचा सहवास लाभावा, कोऱ्या पुस्तकाला हात लावण्याचा, ते चाळण्याचा आनंद घेता यावा, त्यातून वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
- विनायक जोशी, संस्थापक-अध्यक्ष, बालक पालक फाउंडेशन
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT