पुणे

शहर, जिल्ह्यातील अनधिकृत होर्डिंग्ज हटवा

CD

अनधिकृत होर्डिंग्ज हटवा;
सुप्रिया सुळे यांची मागणी
पुणे, ता. १ ः पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात होर्डिंग्ज कोसळण्याच्या दुर्घटना घडू लागल्या आहेत. त्या टाळण्यासाठी अधिकृत होर्डिंग्जचे सुरक्षा ऑडिट करा आणि अनधिकृत होर्डिंग्ज त्वरित हटवा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरद्वारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, दोन्ही महापालिकांचे आयुक्त, पीएमआरडीए आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून पालकमंत्र्यांनी अहवाल मागवून घ्यावा आणि संबंधित यंत्रणांना अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याचा आदेश द्यावा. हिंजवडी येथे वादळी पावसात होर्डिंग कोसळले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु ते अधिकृत होते की अनधिकृत याची माहितीच महापालिकेकडे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय पुणे महापालिका हद्द आणि जिल्ह्यातही काही ठिकाणी यापूर्वी होर्डिंग्ज कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत.
अनधिकृत होर्डिंग्जच्या विविध माध्यमांमध्ये प्रसिद्घ झाल्याचे बातम्यांचे दाखले सुळे यांनी दिले आहेत.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Himalayan Flood Risk : हिमाचल अन् तिबेटमध्ये 'टाईम बॉम्ब' सक्रिय! सतलज खोऱ्यातील 1,048 सरोवरांमुळे भारतात मोठ्या विनाशाचा धोका; NDMA चा धक्कादायक अहवाल

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 30 ऑगस्ट 2026

साप्ताहिक राशिभविष्य (३० ऑगस्ट २०२६ ते ६ सप्टेंबर २०२६)

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मागण्या केल्या मान्य

RSS Chief Mohan Bhagwat : 'भारतात मुस्लिमांनी राहू नये' असे म्हणणारी व्यक्ती हिंदू असू शकत नाही; आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरुन मोहन भागवत यांचे मोठे विधान, सर्वधर्मीय सलोख्याचा दिला संदेश

SCROLL FOR NEXT