पुणे

आषाढी वारीनिमित्त ‘वैद्यकीय सेवा शिबिर’ उपक्रम

CD

पुणे, ता. १० ः अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पश्‍चिम महाराष्ट्र प्रदेश आणि महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ, नाशिक यांच्या वतीने आषाढीवारीनिमित्त वारीच्या विविध मार्गांवर वैद्यकीय सेवा शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. उपक्रमाच्या माध्यमातून जिज्ञासाचे विद्यार्थी वारीत सेवाकार्य करणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्‍चिम महाराष्ट्राचे प्रदेशमंत्री अनिल ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रसंगी जिज्ञासा प्रदेश संयोजक रोहन मुक्के, वैद्यकीय सेवा शिबिर प्रमुख श्रीपाल राजपुरोहित आदी उपस्थित होते. यावेळी ठोंबरे म्‍हणाले, ‘‘शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणे, विद्यार्थी जीवन आनंदमय होण्यासाठी अनेक उपक्रम राबवणे, याच सोबत सर्व विद्यार्थ्यांमध्ये समाजाप्रती सेवाभाव निर्माण करण्यासाठी अभाविप आपल्या विविध आयामांमार्फत विविध उपक्रम राबवते. जिज्ञासा त्यातीलच एक आहे.’’
यंदा पुण्यात तीन तसेच सासवड, बारामती, लोणंद, निगडी, फलटण, अकलूज, इंदापूर, माळशिरस आदी ठिकाणी हे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरे उपलब्ध असून त्याद्वारे वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा दिल्या जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Farmers Protest: संतापलेल्या शेतकऱ्यांकडून रस्त्यावरच धान रोवणी ; ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभाराचा नोंदवला निषेध

Gujarat Rain Update: गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, २४ तासांत तब्बल १०६४ मिमीची नोंद; तिसऱ्या क्रमांकाचा विक्रम

पु. ल. देशपांडेंची 'बटाट्याची चाळ' नव्या रूपात! रंगभूमीवर रंगणार भव्य सांगीतिक प्रयोग

Latest Marathi News Live Update : 'तावडे हॉटेल' अतिक्रमणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर; पुढील सुनावणी २७ ऑगस्टला होणार

Maharashtra Farm Loan Waiver : पुणे जिल्ह्यातील 61,900 शेतकऱ्यांना 533 कोटींची कर्जमाफी; दुसरी यादी जाहीर, तुमचं नाव आहे का?

SCROLL FOR NEXT