Paithan Isarwadi Ashadhi wari  sakal
पुणे

Ashadhi Wari 2023: धावपळीच्या जगातही सुट्या टाकून कार्यकर्ते वारकऱ्यांच्या सेवेसाठी

CD

पुणे, ता. १२ : ‘‘पालख्या पुण्यात येण्याची तारीख निश्‍चित झाली, की ठरल्याप्रमाणे कोणी तांदूळ देतो, कोणी पीठ देतो, तर कोणी गोड पदार्थाचा खर्च उचलतो. त्यासाठी कोणाला काही सांगावे लागत नाही. गेली पंधरा वर्ष हा उपक्रम सुरु आहे. विठूरायाच्या लाडक्या वारकऱ्यांची या निमित्ताने सेवा करण्याची संधी आम्ही घेतो.’’ असे रविवार पेठेतील कस्तुरे चौक तरुण मंडळाचे अध्यक्ष योगेश येनपुरे सांगतात.

‘‘वारीची तारीख निश्‍चित झाली, की एक महिना आधी दिंडी प्रमुखांचा फोन येतो. आमचा साठ जणांचा ग्रुप आहे. पुण्यात पालखी आगमनाच्या आदल्या दिवशी ठरल्याप्रमाणे सगळे पैसे जमा करतात. दरवर्षीचा मेनू ठरलेला आहे. त्यानुसार भोजनाचा कार्यक्रम पार पडतो,’’ असे शनिवार पेठेतील अखिल शनिवार वारकरी मित्र मंडळ आणि बस कंपनीचे ग्रुपचे सदस्य भाऊ भिंताडे सांगत होते.


‘साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’ या संतसेना महाराजांच्या अभंगाप्रमाणे पालखीसोबत शहरात येणाऱ्या वारकरीरूपी ‘पाहुण्यां’ची सेवा करण्यास शहरातील गणेश मंडळे, स्वयंसेवी संस्था आणि सहकारी सोसायट्या कामाला लागतात. गेल्या पंधरा वर्षांपासून अखंडपणे सेवेचे हे व्रत नियमितपणे पार पडले जात आहे.’’

‘‘धावपळीच्या जगातही सुट्या टाकून कार्यकर्ते वारकऱ्यांच्या सेवेसाठी दिवसरात्र झटतात. कोणतीही मिटींग घ्यावी लागत नाही, वर्गणी मागावी लागत नाही, स्वत:हून इच्छेनुसार जो तो या अन्नदान कार्यक्रमात आपला हातभार लावण्याचा प्रयत्न करीत असतो.’’ असे कसबा पेठेतील अखिल गुंडाचा गणपती मित्र परिवाराचे संतोष गुळांबे सांगत होते. ‘‘तीस ते चाळीस जणांचा आमचा ग्रुप आहे. वर्गणी काढतो. दरवर्षी वारकऱ्यांना आम्ही भोजन देतो, हे आता परिसरातील लोकांना माहीत झाले आहे. त्यामुळे कोणाला विनंती न करताही लोक स्वत:हून पुढे येतात आणि खारीचा वाटा उचलण्याची तयारी दर्शवितात.

दरवर्षी एक हजार वारकऱ्यांना जेवण, चहा, नाष्टा देतो.’’ असेही गुळांबे म्हणाले. कस्तुरे चौक तरुण मंडळाकडून भोजनबरोबरबच दरवर्षी भारूडाचा कार्यक्रमाचे देखील आयोजन केले जाते. यंदा मात्र त्यामध्ये बदल करीत हभप संग्राममहाराज भंडारे यांच्या कीर्तनाचे आयोजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT