Organ Donation sakal
पुणे

Organ Donation : पुण्यात दहा पटीने वाढले अवयवदान!

पुण्यातील अवयवदान क्षेत्रात गेल्या १९ वर्षांमध्ये क्रांतिकारक बदल झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुण्यातील अवयवदान क्षेत्रात गेल्या १९ वर्षांमध्ये क्रांतिकारक बदल झाला आहे. जनजागृती, कुशल डॉक्टर, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि समन्वय या चार स्तंभांमुळे २००४ ते २०१४ च्या तुलनेत २०१५ ते २०२३ या नऊ वर्षांमध्ये शहरातील अवयव दात्यांमध्ये दहा पटीने वाढले असल्याचे दिसते.

पुणे शहरात २००४ मध्ये अवयवदान ही संकल्पना नवीन होती. व्हेटीलेंटवर रुग्ण श्वास घेताना दिसतो पण, डॉक्टर सांगतात रुग्णाच्या मेंदूचे कार्य थांबले (ब्रेन डेड) आहे. म्हणजे माणूस जिवंत असताना अवयव दान करून घेणार, अशा मूलभूत शंकांपासून शहरात अवयव दानाची सुरवात झाली. त्याला आता १९ वर्षे पूर्ण झाली. या दरम्यानच्या काळात याबद्दल जनजागृती झाली. गैरसमज दूर झाले.

डॉक्टर, रुग्णालय, पोलिस आणि अवयव प्रत्यारोपणातील ‘झोनल ट्रॅन्सप्लँट को-ऑर्डिनेशन कमिटी’ (झेडटीसीसी) यातील समन्वय वाढला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘ब्रेन डेड’ रुग्णाच्या नातेवाइकांना अवयव दानाचे महत्त्व व्यवस्थित समजले. त्यांच्या परवानगीमुळेच विविध अवयवांच्या प्रतीक्षा यादीवर असलेल्या हजारावर रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य झाले, असा विश्वास पुणे ‘झेडटीसीसी’च्या समन्वयक आरती गोखले व्यक्त केला.

व्यवस्था निर्माण झाली

अवयव दानाची व्यवस्था आता पुण्यात निर्माण झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे ही व्यवस्था गतिमान झाली, तसेच त्यातील पारदर्शीपणा स्पष्ट होऊ लागला. रुग्णालयाच्या आतमध्ये आणि रुग्णालयाच्या बाहेर काम करणारे असे दोन घटक आपापल्या जबाबदाऱ्या वेळेत आणि अचूकपणे पार पाडू लागले.

वैद्यकीय जबाबदारी

- दान केलेल्या रुग्णाचे अवयव काढणे

- ते व्यवस्थित बंदीस्त करून सुरक्षितपणे वाहतूक करणे

- रुग्णावर प्रत्यारोपित करणे

- रुग्णालयाबाहेरील जबाबदारी

- पोलिसांच्या मदतीने ग्रीन कॉरिडॉर करणे

- दान केलेल्या अवयवाचे योग्य रुग्णापर्यंत पोचविणे

- अवयव दानाबाबत जनजागृती करणे

असे झाले अवयव दान

२००४ ते २०१४

एकूण अवयव दाते ..... ४१

मूत्रपिंड प्रत्यारोपण ...... ४१

यकृत प्रत्यारोपण ...... १२

२०१५ ते २०२३ (मेअखेर)

एकूण प्रत्यारोपण ....... ४०९

मूत्रपिंड प्रत्यारोपण ....... ५३०

यकृत प्रत्यारोपण ........ ३८२

हृदय ........................ ४३

हृदय आणि फुफ्फुस .... २

मूत्रपिंड आणि स्वादूपींड ... २४

मूत्रपिंड आणि यकृत .......... ९

लहान आतडी .............. ४

हात ........................... १

का वाढले अवयवदान?

- अवयव दान वाढण्यामागे एक सांघिक प्रयत्न आहे.

- अतिदक्षता विभागातील तज्ज्ञांपासून ते स्वच्छता कर्मचाऱ्यांपर्यंत यात सहभागी असतात.

- माध्यमांमुळे अवयव दानात जनजागृती झाली.

- ‘रि बर्थ’सारख्या स्वयंसेवी संस्थेने सातत्याने विविध माध्यमातून शास्त्रीय माहिती दिली

- अवयव दानाचे प्रशिक्षण शिबिरांमुळे मनुष्यबळ वाढले

पुणे शहरात आतापर्यंत १६५ पेक्षा जास्त ग्रीन कॉरिडॉर झाले आहेत. यामुळे अवयव दान होत असताना कोणी कोणती जबाबदारी पार पाडायची हे अनुभवातून निश्चित होत आले आहे. अर्थात, हे कोणत्याच एका माणसाचे काम नसते. त्यामागे मोठी यंत्रणा सक्रिय असते. त्यात समन्वय असतो. त्यामुळे शहरातील अवयव दानाचे प्रमाण वाढणे हे सांघिक यश आहे.

- आरती गोखले, समन्वयक, झेडटीसीसी, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Updates : देवळाली कॅम्पमध्ये हायवा ट्रक बंगल्यात घुसला

Whatsapp Call Feature : इंटरनेट, नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येणार, ते कसे? पाहा एका क्लिकवर

Video : ₹2,500,000,000 मध्ये बनलेल्या रणबीर-आलियाच्या आलिशान घराची झलक समोर ! असं आहे घराचं इंटिरियर

Health Tips: डाएट्‌सच्या फॅड मध्ये अडकलाय? "झिरो फिगरच्या प्रेमात पडण्यापूर्वी आधी फायदे तोटे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT