पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये घेण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना आता नियमित शुल्कासह २१ जूनपर्यंत, तर विलंब शुल्कासह २५ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. दहावीच्या पुरवणी परीक्षेस पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आणि तुरळक विषय, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
परीक्षेसाठी ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर अर्ज भरायचा आहे.
पुरवणी परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज भरताना मार्च २०२३ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती अर्जात ऑनलाइनद्वारे घेता येणार आहे.
श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अटी व शर्तीनुसार श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या मार्च २०२३ परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट २०२३ आणि मार्च २०२४ अशा लगतच्या दोन संधी उपलब्ध राहणार आहेत.
पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या तारखांमध्ये यापुढे कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.
हे लक्षात ठेवा
- नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत : १७ ते २१ जून
- विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत : २२ ते २५ जून
- माध्यमिक शाळांनी बॅंकेत चलनाद्वारे शुल्क भरण्याचा कालावधी : २६ जूनपर्यंत
- माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करणे : २७ जून
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.