पुणे, ता. १६ : “सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या साखळी औषधविक्री दुकानांवर पोलिस कारवाई करण्याचे आश्वासन अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त अभिमन्यू काळे यांनी महाराष्ट्र केमिस्ट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ऑनलाइन औषध विक्री आणि अव्यावसायिक स्पर्धा करणाऱ्या कॉर्पोरेट चेन दुकानांविरोधातील पुरावे संघटनेतर्फे सरकारला देण्यात आले. याबाबत काळे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिल्याची माहिती संघटनेतर्फे देण्यात आली.
संघटनेचे सचिव अनिल नावंदर यांनी सांगितले की, विविध जिल्ह्यांतून ऑनलाइनच्या माध्यमातून औषधे मागविण्यात आली. बेकायदेशीर ऑनलाइन औषधविक्री सर्रास सुरू आहे. याची गंभीर दखल काळे यांनी घेतली.
यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त भूषण पाटील आणि संघटनेच्यावतीने हुकूमराज मेहता, प्रसाद दानवे उपस्थित होते.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.