पुणे, ता. १६ ः आनुवंशिकता, तणाव आणि लठ्ठपणा ही ‘प्रकार २’ मधुमेहाची कारणे आहेत. तणाव आणि लठ्ठपणा या दोन्हींवर मात करण्यासाठी योगासनांची भूमिका खूप महत्त्वाची असते, असे मतमधुमेह संशोधक डॉ. रवींद्र नांदेडकर यांनी व्यक्त केले.
अनुयश आरोग्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘मधुसंवाद’ या मोफत कार्यक्रमात जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘मधुमेह आणि योग’ याविषयावर मार्गदर्शन करताना डॉ. नांदेडकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्टचे विश्वस्त नंदकिशोर राठी, अनुयश आरोग्य प्रतिष्ठानच्या सचिव रूपाली नांदेडकर, विश्वस्त धनंजय नांदेडकर, प्रकल्प समन्वयक विजय निंबाळकर उपस्थित होते.
डॉ. नांदेडकर म्हणाले, ‘‘योगासनांमुळे स्वास्थ्य परिपूर्ण होऊन त्यातून लठ्ठपणावर नियंत्रण मिळण्यास मदत मिळते आणि हळूहळू रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात राहते. मधुमेहामुळे शरीरातील रक्त संचलनावर परिणाम होतो आणि त्यातून विविध जटीलता किंवा गुंतागुंत निर्माण होते. पायांना मुंग्या येणे, बधीरता येणे, एखादी जखम झाल्यास ती लवकर भरून न येणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. मात्र, योगासने केल्यास शरीरातील रक्त संचलन चांगल्या प्रकारे होते. यासाठी पश्चिमोत्तानासन, मंडुकासन आणि धनुरासन ही आसने योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करणे आवश्यक आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.