पुणे/कोथरूड, ता. १६ : कोथरूडच्या शिवतीर्थनगरमध्ये जुनी इमारत पाडताना पुरेशी काळजी न घेतल्याप्रकरणी बांधकाम विभागाने संबंधित बांधकाम व्यावसायिकास नोटीस बजावून काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत.
शिवतीर्थनगर येथील प्रथमेश सहकारी गृहरचना संस्थेची जुनी इमारत पाडून तेथे नवीन इमारत बांधली जाणार आहे. हे काम पीएएडी ॲँड टी प्रॉपर्टी पार्टनर अभिषेक देशपांडे व इतर यांच्याकडे आहे. जुनी इमारत पाडण्याचे काम सुरू असताना सुरक्षतेच्या दृष्टीने काळजी न घेता इमारत पाडण्याचे काम सुरू केले. त्यामुळे मोठा आवाज होऊन सर्वत्र धुळ उडाली. परिसरात सर्वत्र दगड उडाले. अचानक हा प्रकार घडल्याने रस्त्यावर उभे असलेले नागरिक जीव वाचविण्यासाठी घाबरून पळाले, तर धुळीच्या लोटामध्ये अडकलेली दुचाकीस्वार महिला सुदैवाने बचावली. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी प्रत्यक्षदर्शींमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली. याचा व्हिडिओही सोशल मीडियीवर व्हायरल झाला. याप्रकरणी आज महापालिकेकडे तक्रारी प्राप्त झाल्याने संबंधित बांधकाम व्यावसायिकास पुढील आदेशापर्यंत बांधकाम थांबविण्याचे आदेश दिले आहेत. याची प्रत ‘सकाळ’च्या हाती लागली आहे.
स्थानिक नागरिक श्रीपाद चिकणे म्हणाले, ‘‘इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी ती खाली करण्यात आली होती. ठेकेदाराकडून इमारत पाडण्याचे काम सुरू असताना इमारतीचा मोठा भाग पडला. सगळा राडारोडा रस्त्यावर आला होता, तो आम्ही बाजूला केला.
सुनील मराठे म्हणाले की, ‘‘रस्त्यावर वर्दळ असताना अशी कामे करताना खबरदारी घेणे अपेक्षित होते. पण येते कोणतेही नियोजन नव्हते.
शिवतीर्थनगरमधील इमारत पाडताना ती धोकादायकरीत्या पडल्याचा प्रकार घडला आहे. संबंधित बांधकाम व्यावसायिकास काम थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी कारवाई केली जाईल.’’
- प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, पुणे महापालिका
प्रथमेश सोसायटीची इमारत आम्ही पुनर्विकास करण्यासाठी घेतली आहे. ती उतरविण्याचे काम एका ठेकेदाराला दिले आहे. इमारत पाडताना पूर्ण काळजी घेतली होती. त्याचे ३ मजले ब्रेकरने पाडून पूर्ण झाले. पण पोकलेन चालकाच्या चुकीमुळे ही इमारत पडली.
- करण तांबे, भागिदार, पीएएडी ॲँड टी प्रॉपर्टी
फोटो क्रमांक ८८२१, ८८२२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.