पुणे

अरविंद मयेकर यांच्या सतारसाथीचे स्मरण गुंजन

CD

हिंदी-मराठी चित्रपटगीते, भावगीते व नाट्यसंगीतात सतारीच्या साथीची नादमधुर मुद्रा उमटविलेल्या अरविंद मयेकर यांच्या आठवणी जागवणारी ‘गीत सितार’ ही मैफल सर्वार्थाने आगळीवेगळी ठरली. त्यांच्या पत्नी डॉ. अपर्णा मयेकर यांनी त्यांच्या सहजीवन व मयेकरांच्या कारकिर्दीतील विशेष टप्प्यांबद्दल माहिती देत काही गाणी स्वतः सादर केली.

‘नादमुद्रा’तर्फे संगीत सुवर्णयुगातील प्रतिभावान व प्रयोगशील सतारवादक मयेकर यांनी सतारीची साथ केलेल्या काही अजरामर गीतांची प्रस्तुती नुकतीच केली. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात रसिकांना अनेक गीतांमागचे किस्से अपर्णाताईंकडून ऐकायला मिळाले. संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या त्या कन्या. रेखा डावजेकर या नावाने लग्नापूर्वी वाद्यवृंदांच्या माध्यमातून नावारूपास आलेल्या या गायिकेचे लग्नानंतर अपर्णा मयेकर झाले.
‘‘तुझी कला अव्याहत चालू दे. माझी पत्नी म्हणून नव्हे तर तुझा पती म्हणून माझी ओळख कानावर पडू दे, या शब्दात त्यांनी प्रोत्साहन दिले’’, अशी भावपूर्ण आठवण सांगितली. राहुल देव बर्मन यांचे ते आवडते कलावंत होते. ते त्यांना लाडाने मया म्हणत व गीतांमधील सतारसाथीच्या आव्हानात्मक जबाबदाऱ्या त्यांच्यावर विश्वासाने सोपवत, असे सांगून त्यांनी स्पष्ट केले की, मयेकरांचे सतारवादनातील कौशल्य कमी वयातच लक्षात आल्याने पं. रविशंकर यांनी स्वतःहून त्यांना शिकवण्यासाठी वडिलांकडून मागून घेतले. नंतर उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान व पं. जयराम आचार्य यांच्याकडूनही त्यांना विद्या मिळाली.
या कार्यक्रमात गणराज रंगी नाचतो, संथ वाहते कृष्णामाई, लाजऱ्या कळीला भ्रमर सांगतो काही, आनंदी आनंद गडे, ओ बसंती पवन, वो जब याद आए, हमें तुम्हे प्यार कितना, बहारों मेरा जीवन ही, तेरे नैना तलाश करें, पिया तोसे नैना, दिल पुकारे, तेथे बिना जिंदगी से कोई आदी गीते सावनी सावरकर, रेणू बोरकर, माधुरी कासट, नील सुळे, निशांत पाटे, सचिन इंगळे आणि डॉ. अपर्णा मयेकर यांनी प्रस्तुत केली. अमृता ठाकूर देसाई, रशिद शेख, सचिन वाघमारे, किरण एकबोटे, वासुदेव बापट, मनीष सबनानी, सचिन इंगळे आणि विशेष सतारसाथ कल्याणी देशपांडे यांची होती. सूत्रसंचालन सोनाली श्रीखंडे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT