पुणे

पर्यटक निवासांमध्ये योग दिवस

CD

पुणे, ता. १८ ः योगशास्त्राचा प्रचार व प्रसार वाढविण्यासाठी आणि पर्यटकांमध्ये जनजागृती करण्यासाठी बुधवारी (ता. २१) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासामध्ये जागतिक योगदिन साजरा करण्यात येणार आहे.
जागतिक योग दिनाला प्रोत्साहन महामंडळाच्या अखत्यारीत येत असलेल्या सर्व पर्यटक निवासांमध्ये वास्तव्यास आलेल्या पर्यटकांना एकत्रितपणे काही वेळ योगासने करण्यावर भर देणार आहे. पर्यटक निवासाच्या परिसरातील स्थानिक स्तरावरील योग प्रशिक्षण संस्थेस किंवा व्यक्तीस पर्यटक निवासात बोलावून वास्तव्यास येणाऱ्या पर्यटकांना योगाचे जीवनामधील महत्त्व, योगाचे प्रकार, योगाचा फायदा सांगण्यात येईल.
महामंडळाच्या सर्वच पर्यटक निवासांमध्ये जागतिक योगदिन साजरा करण्याबाबतची आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा आणि व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी-शर्मा यांनी दिल्या आहेत.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राची जागतिक वारसास्थळे असलेल्या आणि बौद्ध-हिंदू धर्मातील साधू-महंत यांनी ध्यानधारणा करण्यासाठी निवडलेल्या अजंठा, वेरूळ आणि निसर्गरम्य असलेल्या लोणार तसेच ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहरातील पर्यटक निवासामध्येही योगसाधना आयोजित केली आहे.
ऐतिहासिक गडकिल्ले, निसर्गरम्य डोगररांगांवर आणि समुद्राच्या किनारी असलेल्या महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये योगासने करणे ही एक अनोखी पर्वणी असून त्याचा पर्यटकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "देश ज्ञानेश कुमारांच्या बापाचा आहे का?" उद्धव ठाकरे कडाडले; केंद्र सरकारवरही बोचरी टीका

Maharashtra MLC Election 2026 : भाजपची मोठी घोषणा! विधान परिषद निवडणुकीसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचे उमेदवार जाहीर; पाहा संपूर्ण यादी

Latest Marathi News Live Update : CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Masarul Dam Water: अवैध उपशामुळे धरणाच्या पाणीसाठ्यावर संकट;मासरूळ धरणातील उपशावर कारवाईची मागणी

Kikvi Project Deal : किकवी प्रकल्प व्यवहाराच्या कोणत्याही चौकशीस तयार माजी संचालकांचा खुलासा; करार पारदर्शी

SCROLL FOR NEXT