पुणे

मतदान केंद्रांच्या ठिकाणी असणार पाळणाघर

CD

पुणे, ता. १७ ः लहान मुले घेऊन सुद्धा मतदानाला जाता येणार आहे. कारण मतदान केंद्रांच्या ठिकाणी पाळणाघराची व्यवस्था करण्यात येणार आहे. पाळणाघरांची जबाबदारी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यावर असेल. मतदान करण्यासाठी जेवढा वेळ लागेल, तेवढा वेळ पाळणाघरात अंगणवाडी सेविकेने दिलेल्या खेळण्यांसोबत बाळे खेळू शकणार आहेत. तर अंगणवाडी सेविकांनी मात्र विनामोबदला काम करावे लागत असल्याने नाराजी व्यक्त केली.
महिला मतदारांनी घराबाहेर पडून जास्तीतजास्त मतदान करावे, महिलांचा मतदानातील टक्का वाढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाचहून मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी पाळणाघर करण्याचे नियोजन केले. सुमारे दोन हजार १०० ठिकाणी पाळणाघर असतील. पाळणाघरात पिण्याचे पाणी, खेळण्यांबरोबरच बाळाला आवश्यकतेनुसार पोषक आहारदेखील उपलब्ध असणार आहे. त्यामुळे बाळाला घेऊन मतदानाला आल्यानंतर अंगणवाडी ताईंकडे बाळ सोपवून महिला मतदार निश्चितपणे मतदान करू शकतात, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
लोकसभा निवडणुकीत पुणे शहरातील काही मतदान केंद्रावर पाळणाघरातील अंगणवाडी सेविकांना जेवणदेखील मिळाले नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. याबाबत एक अंगणवाडी सेविका म्हणाली, ‘‘आम्हाला मतदानाच्या या कर्तव्यात काम करण्यास मिळते, याचा आनंद आहेच. परंतु, प्रशासन केवळ आम्हाला आदेशच देणार का, लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवरील इतर कर्मचाऱ्यांना जेवण पोहचले, पण आम्हाला साधे पाणीदेखील विचारले नव्हते. मोबदला तर दूरच, पण किमान आम्हाला तुमचे काम कसे चालले आहे, हे पाहणीला आलेल्या वरिष्ठांनी विचारावे.

एकूण केंद्रे...
मतदान केंद्र - ८ हजार ४६२
मतदान केंद्रांची ठिकाणे - ३ हजार २३३
पाळणाघर असलेली मतदान केंद्रांची ठिकाणे - २ हजार १००

पाळणाघरात काय असणार?
- मुलांना बसण्यासाठी बाहुली घरे
- खेळणी
- शैक्षणिक साहित्य

पाळणाघर संख्या...
शहरात - ७००
ग्रामीण - १,३००
नगरपालिका - १००

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पाळणाघराचे काम देण्यात आले आहे. ज्याप्रमाणे मतदान केंद्रात अन्य शासकीय कर्मचाऱ्यांना अतिरिक्त निवडणूक भत्ता दिला जातो, त्या प्रमाणात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पण देण्यात यावा. लोकसभा निवडणुकीमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी काम केले. पण अद्यापही निवडणूक भत्ता देण्यात आला नाही. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष पसरला आहे.
नीलेश दातखिळे, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ

मतदान केंद्रांवरील पाळणाघरांचे नियोजन झाले आहे. पाचपेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी पाळणाघर करण्यात येणार आहेत. अंगणवाडी सेविकांना त्याबाबत सूचनाही केल्या आहेत. सेविका सकाळी मतदान सुरू झाल्यापासून ते मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पाळणाघरात उपलब्ध असतील. त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्याबाबत त्या-त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. मोबदला देण्याबाबत आयोगाकडून सूचना करण्यात आल्या नाहीत.
मोनिका रंधवे, नोडल अधिकारी, पाळणाघर तथा बालविकास प्रकल्प अधिकारी, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway Accident: सूर्योदय पाहून परतताना क्षणात सर्व संपलं… मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघातात IIT च्या तीन विद्यार्थ्यांचा अंत

US Visa Bond Policy : डोनाल्ड ट्रम्प यांचा ५० देशांना दणका ! व्हिसा बाँड केला अनिवार्य, नेमकं काय आहे प्रकरण ?

Dharashiv:धाराशिवमध्ये गुढीपाडव्याला म्हशी-रेड्यांच्या शर्यतीचा थरार; परंपरेचा जल्लोष

Chhatrapati Sambhajinagar: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घरखरेदीचा उत्साह; २५० गृहप्रवेशासह बाजारात तेजी

विद्यापीठाचा मोठा निर्णय! 'सीसीटीव्ही' असलेल्या कॉलेजमध्येच आता परीक्षा केंद्र; ‘लॉ’ची परीक्षा त्याच महाविद्यालयात, २ एप्रिलपासून परीक्षा, वाचा...

SCROLL FOR NEXT