पुणे

ओबीसीसाठी महायुतीकडून विविध निर्णय ः रासने

CD

पुणे, ता. १७ ः ओबीसीच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक उन्नतीसाठी महायुती सरकारने विविध निर्णय घेतले असून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी सांगितले.
रासने म्हणाले, ‘‘महायुती सरकारने ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा दिला. स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना केली. गेल्या अंदाजपत्रकात चार हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली. वैद्यकीय सेवेत राष्ट्रीय कोट्यात २७ टक्के आरक्षण दिले. शिक्षण, रोजगार, छात्रावास, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती असे निर्णय घेतले. विविध समाजासाठी आर्थिक विकास महामंडळांची स्थापना केली. ‘महाज्योती’च्या माध्यमातून विविध योजना राबविल्या. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ओबीसींसाठी २६ आदेश काढले. फुले दाम्पत्याने भिडे वाड्यातील सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेचे राष्ट्रीय स्मारक म्हणून निर्मितीचे काम पूर्ण करणार आहोत.’’
माहेश्वरी समाज, अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ, श्री. खंडेलवाल (वैश्य) समाज, स्वराज्य सेना, कुंभार समाजोन्नती मंडळ, अल्पसंख्याक कल्याण आघाडी, श्री गुरव प्रतिष्ठान, कालिकादेवी संस्थान, असोसिएशन ऑफ अमॅच्युअर बॉक्सिंग, रिक्षा संघटना येहुवा सबकेनु ख्रिस्ती संघ यांच्यासह कसबा मतदारसंघातील गणेश मंडळांनी हेमंत रासने यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: हरिश राणाच्या इच्छामरणासाठी १३ वर्षे का लागली? कायदा, कोर्ट आणि वेदनेची पूर्ण कहाणी; ही पहिलीच केस नाही तर…

UPSC Fake Rank Case : युपीएससी उत्तीर्ण तरुणाचा आमदार अन् पोलिसांनी केला सत्कार; सत्य समजताच सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली

Indian Women Hockey: पात्रता मिळवली, आता लक्ष्य विजेतेपदाचे; भारतीय महिला हॉकी संघाचा आज इटलीविरुद्ध उपांत्य सामना

Viral Video: व्हायरल होण्यासाठी वादग्रस्त कृत्य! चेंबूरमध्ये आगरी-कोळी परंपरेचा अपमान, व्हिडिओनंतर उसळला संताप

'मी तिला किस करणार नाही' संजय दत्तने 'या' अभिनेत्रीसोबत किसिंग सीन करण्यास दिलेला नकार, म्हणालेला...'तिला मी...'

SCROLL FOR NEXT