पुणे

ठेकेदाराच्या खूनप्रकरणी पोलिसांकडून तिघांना अटक

CD

पुणे, ता. १७ : डोणजे (ता. हवेली) परिसरातील ठेकेदाराचे खंडणीसाठी अपहरण करून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुख्य आरोपी योगेश ऊर्फ बाबू किसन भामे (रा. डोणजे, ता. हवेली) हा अद्याप पसार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

विठ्ठल सखाराम पोळेकर (वय ७०, रा. पोळेकरवाडी, डोणजे) असे खून झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. याबाबत पोळेकर यांच्या मुलीने हवेली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून योगेश ऊर्फ बाबू किसन भामे (रा. डोणजे, ता. हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल पोळेकर यांचे १४ नोव्हेंबर रोजी सिंहगड किल्ल्याजवळून अपहरण करण्यात आले होते. आरोपी योगेश भामे याने खंडणी न दिल्यास पोळेकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे पोलिसांना योगेश आणि त्याचा भाऊ रोहित किसन भामे यांनी पोळेकर यांचे अपहरण केल्याचा संशय होता.

गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यावेळी आरोपी मोटारीतून नाशिकच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी नाशिकमध्ये आरोपींचा शोध घेतला. त्या वेळी आरोपी रेल्वेने मध्यप्रदेशमधील जबलपूरला गेल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी जबलपूर पोलिसांच्या मदतीने तपास करून शुभम पोपट सोनवणे (वय २४, रा चिंचोली गुरव, ता. संगमनेर) आणि मिलिंद देविदास थोरात (वय २४, रा. बेलगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) या दोघा आरोपींना अटक केली. चौकशीत त्यांनी मुख्य आरोपी योगेश भामे याच्या सांगण्यावरून संगनमताने हा गुन्हा केल्याचे सांगितले.

याप्रकरणी पोलिसांनी रोहित किसन भामे (वय २२, रा. डोणजे, ता. हवेली) यालाही अटक केली आहे. न्यायालयाने २१ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे पोलिस अधीक्षक देशमुख यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT