पुणे, ता. १९ : देशातील सर्वांत मोठे आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन प्रदर्शन शिवाजीनगरच्या नवीन कृषी महाविद्यालय मैदान, सिंचननगर येथे २१ ते २४ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी (ता. २१) सकाळी ११ वाजता सीमा सुरक्षा दलाचे उपायुक्त राजा बाबू सिंग यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक विजय बोत्रे, सोनिया कोंजेटी, गणेश निबे आणि यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊरचे अध्यक्ष सुभाष जगताप हे असतील, अशी माहिती ‘वसू इव्हेंट आणि हॉस्पिटॅलिटी’चे वसंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी महाराष्ट्र नर्सरी मेन असोसिएशनचे अध्यक्ष शशिकांत चौधरी, सचिव आनंद कांचन, मनोज देवरे, अशोक भुजबळ, राजेंद्र चव्हाण, सुनील चोरगे, महिपाल राणा, नेहा त्यागी आदी उपस्थित होते.
बागायती, फुलशेती, आर्बोरीकल्चर, कृषी व्यवसाय आणि प्रगत प्रक्रिया तंत्रज्ञानावरती आधारित प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती, तसेच बागकाम क्षेत्रातल्या अधिक नवनवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत. यामध्ये देशातील आणि परदेशातील शेतकरी, व्यावसायिक प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार असून, सकाळी १० ते ७ पर्यंत पुणेकरांना पाहता येणार आहे. तरी जास्तीत जास्त पुणेकरांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.