पुणे

मतदान वाढण्यासाठी कंबर कसली

CD

पुणे, ता. १९ ः मतदान करण्यासाठी शहरी भागातील मतदारांमध्ये निरुत्साह दिसून येतो, हा पुण्यातील मतदारांवर पडलेला शिक्का पुसण्यासाठी प्रशासनाने दृढ निश्चयच केला आहे. जनजागृतीसह विविध सोई, सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर मागील तीन विधानसभा निवडणुकांची टक्केवारी ही सरासरी पन्नास टक्क्यांच्या आसपास राहिलेली आहे. तर ज्या भागात कमी मतदान होते, असे भाग निश्चित करून तेथील मतदानात वाढ होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
पुण्यातील सुशिक्षित असा मतदार मतदान करण्याकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आत्तापर्यंतच्या निवडणुकांतील टक्केवारी बघितल्यानंतर लक्षात येते. आता याच पुणेकरांनी घराबाहेर पडून मतदान करावे म्हणून मतदारांमध्ये जनजागृती, मतदारांच्या दारातच मतदान केंद्र आणले, पिण्याच्या पाण्यापासून ते वाहनांच्या पार्किंगपर्यंतची व्यवस्था करण्याची काळजी प्रशासनाने घेतली आहे. पुण्यातील विधानसभा मतदारसंघात गेल्या तीन निवडणुकांमध्ये सर्वाधिक कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये ६१.५७ टक्के एवढे मतदान झाले होते. २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये एकाही मतदारसंघात पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होऊ शकले नव्हते. तर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत टक्केवारीमध्ये वाढ झाली. केवळ पुणे कॅन्टोमेंन्ट मतदारसंघ वगळता सर्व मतदारसंघात पन्नास टक्क्यांहून अधिक मतदान झाले. तर २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा मतदानात घट झाली. पुण्यातील मतदारसंघात टक्केवारी वाढ होण्याऐवजी सर्वच मतदारसंघात घट झाली. सर्वाधिक दहा टक्क्यांनी घट ही कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात झाली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मतदानाची टक्केवारीचे प्रमाण कमी होत असल्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्तांनी देखील चिंता व्यक्त केली होती. प्रशासनासमोर आता ही टक्केवारी वाढवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. प्रशासनाने सर्वाधिक भर हा मतदान जनजागृतीवर दिला, त्याचबरोबर ज्येष्ठ, दिव्यांग, महिला मतदारांसाठी विविध सुविधा करण्यात आल्या आहेत.

प्रशासनाने हे केले
- विविध प्रसार माध्यमातून जनजागृती
- महाविद्यालये, मॉल, दुकान आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊन मतदारांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली
- शाळांमधून विद्यार्थ्यांनी पालकांना मतदान करण्याचे आवाहन करणारी पत्रे लिहिली
- प्रशासनाकडून ८५ टक्के मतदान चिठ्ठ्यांचे वाटप
- सोसायट्यांमधील मतदानवाढीसाठी १२६ सोसायटीमध्येच मतदान केंद्र
- स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्थांचा मतदानाचा टक्का वाढण्यासाठी पुढाकार
- महापालिकेच्या समाजविकास विभागाच्या वतीने महिलांची शपथ, महिला रॅली काढण्यात आली
- दृष्टिहीन मतदारांना मतदार चिठ्ठ्यांचे वाटप
- प्रत्येक मतदारसंघात ज्येष्ठांसह दिव्यांगांना मतदान केंद्रांवर ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था
- १० लाख ५४ हजार इपिक कार्डचे वाटप करण्यात आले

मागील तीन वर्षांची शहरातील मतदानाची टक्केवारी
मतदारसंघ - २००९ - २०१४ - २०१९
वडगावशेरी - ४५.७८- ५४.०१ - ४६.९७
शिवाजीनगर - ४२.८५- ५१.९५ - ४३.८६
कोथरूड - ४६.३६- ५६.५७ - ४८.२०
खडकवासला - ४९.३७ - ५४.९१ - ५१.४०
पर्वती - ४५.४५ - ५५.८१ - ४९.५०
हडपसर - ४५.४२ - ५२.३५ - ४७.२३
पुणे कॅन्टोमेंन्ट - ३५.९३ - ४७.२२ - ४३.४३
कसबा पेठ - ४९.०७ - ६१.५७ - ५१.६२

लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी चार टक्क्यांनी वाढली. या विधानसभा निवडणुकीत देखील मतदानाची टक्केवारी वाढण्याची आम्हाला अपेक्षा आहे. मतदान केंद्रांवर रांगा लागणार नाही याचे
नियोजन केले आहे. मतदार जनजागृतीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात
घेण्यात आले, त्यामध्ये मतदारांचा सहभाग होता.
- डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

Railway Ticket Booking: 'रेलवन' ॲपचा ‘डिजिटल’ गोंधळ! पैसे वजा होऊनही तिकीट गायब; अधिकाऱ्याकडे तक्रार केली पण...

अखेर 'त्या' शिक्षकावर गुन्हा दाखल; विद्यार्थिनीला मारहाण केल्याचं प्रकरण; 'सकाळ'ने घटना आणली होती समोर

Yavatmal Crime : जुन्या वादातून तरुणाचा खून; आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT