नूमविच्या विजयात साई बोराडेची चमक
पुणे, ता. १९ : पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्सच्या क्रिकेट स्पर्धेत मुलांच्या गटात नूतन मराठी विद्यालयाने अरण्येश्वर इंग्लिश संघावर ५९ धावांनी दणदणीत विजय मिळविला. साई बोराडे याची ३३ धावांची खेळी त्यांच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरली.
अन्य लढतींत ज्ञानप्रबोधिनी (नवनगर), नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूल आणि ससाणे एज्युकेशन सोसायटी या संघांनी शानदार विजय मिळविला. हे सामने धायरी येथील कोद्रे फार्म्सच्या मैदानावर झाले.
ज्ञानप्रबोधिनीने एज्युकॉन इंटरनॅशनलचा १२ धावांनी पराभव केला. नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूल संघाने मुळशीच्या इंडस संघावर नऊ गडी राखून मात केली. ससाणे एज्युकेशन सोसायटी संघाने लोणी काळभोरच्या सेंट तेरेसा संघाविरुद्ध ३१ धावांनी विजय मिळविला.
संक्षिप्त धावफलक
नूतन मराठी विद्यालय ः ८ षटकांत ४ बाद ८८ (साई बोराडे ३३, कुणाल कुंभार नाबाद २३, अवांतर १७, आर्यन जाधव २/१४) ५९ धावांनी विजयी विरुद्ध अरण्येश्वर इंग्लिश ः ८ षटकांत ५ बाद २९ (रंजन मंगेशकर १३, देवांश अहिरे ८, आर्य पाटील १/२, विराज नांगरे १/४)
सामनावीर : साई बोराडे
ज्ञानप्रबोधिनी, नवनगर ः ८ षटकांत १ बाद ६९ (अर्जुन परदेशी नाबाद ३६, रितेश भोसले १७, अवांतर १५, शिवम लगड १/११) १२ धावांनी विजयी विरुद्ध एज्यूकॉन इंटरनॅशनल ः ८ षटकांत ४ बाद ५७ (शिवम लगड नाबाद १४, राहुल चौधरी १४, ध्रुव कुलकर्णी २/९, चैतन्य दीक्षित २/१५)
सामनावीर : ध्रुव कुलकर्णी
इंडस, मुळशी ः ८ षटकांत ५ बाद ४९ (नीव मिश्रा १२, अवांतर १५, वीरेंद्र धुमाळ १/५, आदेश चौरे १/६, समर्थ मणिरे १/५) नऊ विकेट राखून पराभूत वि नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूल, फुलगाव ७ षटकांत १ बाद ५१ (विराज हंबीर नाबाद २८, शंभूराज कदम १०, आदेश चौरे नाबाद ९, रेहान बकोरिया १/१०)
सामनावीर : विराज हंबीर
ससाणे एज्युकेशन सोसायटी ः ८ षटकांत १ बाद ८८ (श्लोक हिंगणे नाबाद ४६, आयुष सकपाळ २५, अवांतर १५, अथर्व कोल्हाळ १/३) ३१ धावांनी विजयी विरुद्ध ः सेंट तेरेसा, लोणी काळभोर ः ८ षटकांत ३ बाद ५७ (कुलजीत भट्टी १७, अवांतर २२, आयुष सकपाळ २/१६)
सामनावीर : आयुष सकपाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.