आर्यन्स वर्ल्डची विद्याभवनविरुद्ध शतकी धावसंख्या
पुणे, ता. १९ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्सच्या क्रिकेट स्पर्धेत मुलांच्या विभागात आर्यन्स वर्ल्डने विद्याभवनविरुद्ध आठ षटकांतच शतकी धावसंख्या नोंदविली. आर्यन्सने ६२ धावांनी दमदार विजय संपादन केला. श्रावण शेट्टीने ४७ धावांची नाबाद झंझावाती खेळी साकारली.
बिबवेवाडीतील टेंबेकर फार्म्सच्या मैदानावर हे सामने झाले. अन्य लढतींत कल्याणी स्कूल (मांजरी), सिंहगड स्प्रिंगडेल व ट्री हाऊस या संघांनी विजय मिळविले. कल्याणीने एसपीएम पब्लिकचा सात विकेट राखून पराभव केला. ट्री हाऊसने (कर्वेनगर) ब्लूमिंग डेलवर (नारायणगाव) सात विकेट राखून मात केली. सिंहगड स्प्रिंगडेलने (आंबेगाव) डॉल्फिन इंग्लिशविरुद्ध (सूस) दहा विकेट राखून बाजी मारली.
संक्षिप्त धावफलक
आर्यन्स वर्ल्ड, वारजे : ८ षटकांत ३ बाद १०९ (शौर्य कोंडे २२, श्रावण शेट्टी नाबाद ४७, अवांतर २६, मयंक पाल १/१९) ६२ धावांनी विजयी विरुद्ध विद्याभवन, मॉडेल कॉलनी : ८ षटकांत ८ बाद ४७ (आदित्य भागवत १०, अवांतर १०, स्वरित पांगारे २/१२, दक्ष दुसाने ३/७, श्रावण शेट्टी २/७)
सामनावीर : श्रावण शेट्टी
एसपीएम पब्लिक : ८ षटकांत २ बाद ५४ (मौर्य पाटील नाबाद २२, शौर्य हावळ नाबाद १०, अवांतर १५, आदित रमण १/८) सात विकेट राखून पराभूत विरुद्ध कल्याणी, मांजरी : ६ षटकांत ३ बाद ५६ (अथर्व सातव नाबाद २८, शाम जीआर नाबाद ९, अवांतर १०, मौर्य पाटील १/२)
सामनावीर : अथर्व सातव
ब्लूमिंग डेल, नारायणगाव : ८ षटकांत ६ बाद ७१ (ह्रीदान गांधी २२, संवाद गायकवाड १४, अथर्व फुलसुंदर ११, अंबर लावंड १/१३, सुधन्वा गुडूर २/१८) सात विकेट राखून पराभूत विरुद्ध ट्री हाऊस, कर्वेनगर : ७.३ षटकांत ३ बाद ७२ (अनय नार्वेकर ४३, जय वायकर १/६, अर्जुन बुट्टे पाटील १/९)
सामनावीर :अनय नार्वेकर.
डॉल्फिन इंग्लिश, सूस : ८ षटकांत २ बाद ४५ आर्यनबिन हुसेन नाबाद १९, कुशल चौधरी १०, अवांतर १३, श्रीकृष्ण जगताप १/९) दहा विकेट राखून पराभूत विरुद्ध सिंहगड स्प्रिंगडेल, आंबेगाव : ३.३ षटकात बिनबाद ४७ (आयुष तळेकर नाबाद १६ उत्कर्ष रानीपा नाबाद १५, अवांतर १६)
सामनावीर : आयुष तळेकर
-----------------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.