पुणे

राज्यात आजपासून पशुगगणना

CD

पुणे, ता. २४ ः राज्यात एकविसाव्या पशुगणनेला सोमवार (ता. २५) पासून सुरुवात होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत मोबाइल ॲपच्या माध्यमातून ही पशुगणना होणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्तालयाचे सहसंचालक सुषमा जाधव यांनी दिली.
पशुपालन ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. अर्थव्यवस्थेत याचे लक्षणीय योगदान आहे. शासनाला नियोजनासाठी पायाभूत सांख्यिकीची आवश्यकता असून ही माहिती गणनेच्या स्वरूपात गोळा केली जाते. पशुधनामध्ये महाराष्ट्र संपन्न राज्य असून, देशात सातव्या क्रमांकावर आहे. तसेच कुक्कुट व कुक्कुट पक्षी यामध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. पशुधनाच्या निरंतर विकासासाठी आणि चांगल्या योजना आखण्यासाठी पशुगणना महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असते. पशुपालन पूरक उत्पन्ननिर्मिती बरोबरच दूध, अंडी व मांस ही पशुधन उत्पादने पोषक आहाराचा महत्त्वाचा स्रोत आहे. प्रत्येक पाच वर्षांनी पशुगणना घेण्यात येत आहे. २०१९ मध्ये विसाव्या पशुगणनेमध्ये प्रथमच प्रजाती व ग्रामीण आणि नागरी क्षेत्रनिहाय पशुधनाची आकडेवारी गोळा करण्यात आली. विसाव्या पशुगणनेच्या अहवालानुसार राज्यात एकूण तीन कोटी ३० लाख ८० हजार पशुधन असून, मागील पशुगणनेच्या तुलनेत १.८३ टक्क्यांची वाढ झाली. या वेळच्या पशुगणनेच्या माध्यमातून राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रनिहाय कुटुंब, कौटुंबिक उपक्रम, बिगर-कौटुंबिक उपक्रम आणि संस्था, गोशाळा यांच्याकडे असलेल्या आणि राज्यात आढळणाऱ्या १६ पशुधन प्रजाती व कुक्कुट पक्षी यांची जातीनिहाय, वयोगट तसेच लिंगनिहाय आकडेवारी गोळा केली जाणार आहे. ही पशुगणना नोव्हेंबर ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT