डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून
नदीपात्र अतिक्रमणाची दखल
पुणे, ता. २९ : मुठा नदीपात्रात अनधिकृत बांधकामे होत आहेत. याशिवाय बांधकाम क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक राडारोडा टाकून नदीपात्रात अतिक्रमण करीत असल्याचे उघडकीस आल्यामुळे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे तसेच पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण यांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना शनिवारी दिल्या.
डेक्कन जिमखाना येथे नदीपात्रात अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचा प्रकार ‘सकाळ’ने नुकताच उघडकीस आणला. नदीपात्रात राडारोडा टाकला जात असल्याचेही महापालिका आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या पत्रव्यवहारातून उघड झाले आहे. त्यातूनच पुण्यात पूरस्थिती उद्भवली होती. त्यामुळे तेथील असंख्य नागरिकांचे स्थलांतर करावे लागले होते. यात अनेक नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले होते.
नदीपात्रातील अतिक्रमणामुळे पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून सूचना देण्यात आल्या होत्या. त्याची गांभीर्याने दखल घेऊन सीसीटीव्हीद्वाररे लक्ष ठेवावे, भरारी पथकांद्वारे नियमित तपासणी करावी, या सातत्याने बाबत कारवाई करावी आदी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.