पुणे

‘आपलं घर’, किरण पुरंदरे यांना प्रार्थना समाजाचे पुरस्कार जाहीर

CD

पुणे, ता. २९ : पुणे प्रार्थना समाजाच्या यंदाच्या वार्षिकोत्सवानिमित्त विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यात ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कारा’ने सन्‍मानित करण्‍यात येणार आहे. पर्यावरणतज्‍ज्ञ किरण पुरंदरे यांना ‘रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुरस्कार’ आणि ‘आपलं घर’ संस्थेला ‘डेव्हिडा रॉबर्टस पुरस्कार’ प्रदान करण्यात येईल.
पुरस्कार प्रदान सोहळा बुधवारी (ता. ४ डिसेंबर) सायंकाळी पाच वाजता भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात होणार आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव डॉ. दिलीप जोग, खजिनदार प्रशांत पाडवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुरस्कार वितरण मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते होणार आहे. समाजातील विविध घटकांसाठी विविध क्षेत्रांत दिलेल्या प्रदीर्घ व बहुमोल योगदानाबद्दल ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना सन्मानित करण्यात येणार आहे. ‘निसर्ग वेध’ संस्थेचे संस्थापक किरण पुरंदरे यांना पर्यावरण जतन, संवर्धन, पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करणे आणि पक्षी निरीक्षण या क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल, तर, ‘आपलं घर’ संस्‍थेला अनाथ बालकांचे शिक्षण, कौशल्य विकसन, आरोग्य रक्षण यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात येईल. मानचिन्ह आणि २५ हजार रुपयांचा धनादेश असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT